________________
प्रसंग बेचाळिसावा ॥ श्री वीतराग प्रसन्न ॥
श्लोक :- प्रोल्लसत् परमानंदं जगद्वंद्यं जिनेश्वरं । नत्वा वृषभसेनस्य चरितं रचयाम्यहं ॥ १ ॥ उज्जनीचा तो महाराज । प्रद्योताख्य गुणविराज । गजारूढ तो महाराज । अनुगज प्रयाण वना ।।२।। दूर जावोनिया बना । दरिशृंग हिंडती नाना । गजास्तव दुखिस्त तना । वृक्ष नाना पशेताति ते || ३ || तदा देखिली पूरनगर | ग्राम ते महामनोहर । कूपतटी झाला तो स्थिर । तेथे सुंदर जैन कन्या ||४|| तोय न्यावयासी ते आली । जिनदत्ता नामचि भली । तेथे नरेंद्रान पाहिली । इच्छा जाली जलप्राशनी ॥ ५ ॥ पानी देवोनिया त्यात । पित्या जिनदासा सांगत | बापा पुरुषगुणवंत | पानवठयात आला आहे || ६ || तेव्हा त्वरीत तो येवोनी । अति प्रीती तया भेटोनी । नेले गृहसुखाचे स्थानी। स्नानभोजनी तृप्त केले ||७||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org