________________
प्रसंग एक्केचाळीसावा : ५४७
विमानी बैसोनी समस्त । देवदेवांगनासहित । भावपूजावंदनासमेत । अकृत्यकृत्यभक्तीनिर्भरः ।। ९० ।। श्लोकः स जयतु जिनदेवो यस्य चारित्रमुचै । स्थिरतरमतुलं वै दुष्टनानोपसर्गेः ॥
सकलभुवनसारं दत्तसंसारपारं । परमसुखनिवासं ध्वस्तमोहादिपाशं ॥९१॥
यानंतरे कथाश्रवण । श्रीधर्मघोष मुनीख्यान | प्रणम्य जितेंद्र भगवान । द्यावे अवधान कथेचे ॥ ९२ ॥
श्लोक : - प्रणम्य त्रिजगत् देवं श्रीजिनं धर्म देशकं । वक्षे श्री धर्मघोषाख्यमुनींद्रस्य कथानकं ॥ ९३॥ चंपा नगरी सुंदर | धर्मघोष मुनीश्वर । मासोपवासी दिवाकर । करी आहार गोकुळात ॥९४॥ पारणे तेथे करोनिया | चालले मनइच्छे तया । हरित अंकुर ज्ञानी दया । तृषा हृदया व्याकुळ तो ॥ ९५ ॥
गंगातीरी वटवृक्ष । तेथे बैसला मुनी दक्ष । विश्वात जाला मनोपक्ष । मौन्यसाक्षे तो परमेष्टी ॥९६॥
गंगादेवी तदा पाहत । मुनी तपस्वी तृषावंत । कळस घेवोन स्वहस्त । प्राशुकतोयात हेममय || ९७ || नमस्कारी भावपूर्वक । पानि पाणि घ्यावे उदक । तृषा शांत कराविवेक । मुनीनायक भुवनोत्तम ॥ ९८ ॥ ते श्रवणेसी मुनी मौनी । हस्त सवज्ञान घे पानी | देवता विमानी बैसोनी । विदेहभुवनी गेले ते ।। ९९ ।।
Jain Education International
कथा ६२
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org