________________
५४६ : आराधना-कथाकोष
इति कथा श्री भद्रबाहुची। पुढती ऐका भव्यजीवाची । जने मनसा चढे तयाची । मोक्षमार्गाची तेच वाट ॥७८॥ श्लोक:-श्री सर्वज्ञ प्रणम्योच्चेर्लोकालोकप्रकाशकं । द्वात्रिंशत् श्रेष्ठिपुत्राणां चरित्रं रचयाम्यहं ।।७९।। कौशांबी नगर सुंदर । बत्तीस श्रावक पवित्र । इंद्रदत्तादि बंधुमित्र । द्रव्य सर्वत्र समृद्धगेही ।।८०॥ तेव्हा समुद्रदत्त सर्व । पुत्र ज्ञानी गुणी अपूर्व । देवपूजेसी समभाव । सम्यक्त्वभावमंडित ।।८१॥ जिनपदी जेवि भ्रमर । सर्वबंधुमित्राचा आकार । जन्मोजन्मी पुण्य प्रचुर । सर्वे समग्र नांदताती ॥८२।। अहो पूर्वपुण्यकरोन । संतत संपत सद्गुण । आरोग्य शरीर आयुपूर्ण । धर्म जैन दुर्लभ जीवा ।।८३।। एकदा श्री तीर्थंकरदेव । केवळज्ञानप्राप्तवैभव । त्रैलोक्येंद्र मिळोनी देव । अष्टहि भाव पूजाचिती ।।८४।। नत्वा स्तुत्वा श्रेष्ठीपुत्र ते । सुधर्म ऐकिला भावार्थ । जानोनिया पुण्यपदार्थ । तीर्थनाथ धन्य ते गुरू ।।८५।। जानोनिया सार असार । देह दिसे क्षणभंगुर । दीक्षा मागती विनयकर । भवभवांतर नाशिनी ।।८६।। ते सर्व दिगंबर जाले । तीर्थराय उपदेशिले। तपश्चरण करू लागले । ध्यान धरीले यमुनातटी ॥८७।। कायोत्सर्गी धर्मध्यान । मेरुवत् अचळ मन । मेघवृष्टी महागर्जन । नदी भरोन चालली ते ॥८८।। धर्मध्यानी होते बैसले । समाधीमरण पावले । स्वर्गी इंद्रपद जाहले । भोगु लागले सर्वसुख ॥८९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org