________________
प्रसंग एक्केचाळीसावा : ५४५
ते ऐकोनिया यतीश्वर । तत्त्वज्ञ सांगती होणार । बारा वर्षे दुर्भिक्ष थोर । या धरेवर महादुक्खिस्थ ॥६६॥ सांगोनी अंतराय केला । संघाष्टकामध्ये तो आला । सर्वासी तो सांगता जाला । दुभिक्षेला द्वादशवर्ष.।।६७।। माझे स्वल्प आयुष्यांते । आम्ही स्वस्थ राहू येथे । तुम्ही समजावे मनात । दक्षण देशात जावे त्वरा ॥६८॥ ऐकोनी मुनीचे उत्तर । विशाखाचार्य यतीश्वर । शीषे धेवोनीया समग्र । चालले सर्वत्र दक्षणेसी ॥६९।। देशविहार करित ते । येवोनी करनाटकाते। गोमटस्वामी वंदोनी तेथे । सुखी स्वस्थ त्या पर्वताग्री ॥७०।। गुरू आज्ञा ज्यासी प्रमाण । त्याला सुखासी काय उन । हे जानोन भव्यजीवान । गुरुकृपा संपादोन घ्यावी ।।७१।। येरीकडे उज्जनी नगरी । चंद्रगुप्त तो राज्य करी। दुभिक्षकाळ वियोग भारी । नमोस्तु करी मुनीराया ॥७२।। स्वामि कृपा करोनिया । दीक्षा द्यावी भव तराया। भव्यप्राणी तो जानोनिया । शूर मंत्र तया दिधला ॥७३॥ तीव्र तपश्चर्या करिती । श्रीमत् जिनेंद्रचंद्रयुक्ती । पंचाग्नी साधन साधिती । ध्यान धरिती कायोत्सर्गी ॥७४॥ उज्जनीसमीप वटवृक्ष । द्विदश परीसह सोसी दक्ष । सर्व संन्यास सिद्ध साक्ष । समाधि क्षेम नर साधी ॥७५।। स्वर्गी भोगिती सर्व सुख । तद्दर्शनेन दृष्ट्वा मुख । मम द्यावे अनंतसुख । जन्म चोक्ख भवभवांतरी ।।७६।। श्लोक: श्री सोमशर्म द्विजवंशसन्मणिः श्री भद्रबाहुर्मुनी सत्तमाग्रणीः। जैनेंद्रधर्माब्धिसमयचंद्रमाः कुर्यात् सतां सारसुखाश्रितासु मां ॥७७।।
इति कथा ६१ भद्रबाहुची
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org