________________
५४४ : आराधना कथाकोष
नानापरी क्रीडा करोन । वनसंपत्ति पाहे नयन | तव ते यात्रा वर्द्धमान । श्रीजिन भव्यतारक पै ॥५४॥ मुक्तगामी तीर्थंकर | पंचज्ञानी श्रीजिनवर । चतुर्विंशति भवतार | मध्ये चार चतुर्दश ।। ५५ ।। गोवर्धन मुनिराय । उजेंतगिरी यात्रा जाय । सुखी वदति जय जय । मिळोनी समुदाय कोट्यवधी ॥ ५६ ॥ ग्यारा अंग ते चौदा पूर्व । भद्रबाहु ते जाने सर्व । पंचज्ञान जे का अपूर्वं । जाने सर्व श्रुतकेवळी ॥५७॥। ऐसे गुरू ते ज्ञानवंत । तीर्थरूपासी तो सांगत । सोमश्रमा द्विज त्वरित । सद्गुरू समर्थ विनविले ॥५८॥ विद्यापाठ सर्व केला । मुनीमार्ग सर्व कळला । सिद्धान्तमार्गी सिद्ध जाला । त्यागिता जाला गृहकर्म ॥ ५९ ॥ गोवर्धन श्रीगुरूपाशी । दीक्षा घेतली सुखराशी । पाठक्रिया सामायिकासी । नोकरासी जाप्य करीत ॥ ६० ॥ चतुर्दश ते संघाष्टक | ज्ञानतत्त्व सिद्धान्तपाठक । सर्वामध्ये तो ज्ञानाधिक। श्रुतविकेक सर्वकळा ॥ ६१ ॥ गोवर्धन गुरू आयुष्यांती । ते स्वर्गलोका गते सति । भद्रबाहु शिष्याचे चित्ती । करी खंती तो हृदयात ||६२|| सर्व संघाष्ट मिळोनिया । संतोषविले मुनी तया । श्रुतज्ञान महाधीरा । उपदेश छाया भव्यजीवा ||६३ || यत्प्रकारे विहार करीत । आले उज्जेनी नगरात | भावरीचा जानोनी वक्त । ईर्यापथ शोधीत चालले ||६४ ॥ तेथ मिथ्याती खेळताती । तेन पाहिला नग्न जती । द्विजपुत्र वळखोन म्हणती । जाय जाय परती ठाऊक ।। ६५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org