________________
५४२ । आराधना - कथाकोष
ताराहार उज्वल चामर । चारांगुळ स्वामी अधर । स्वयंभूव तो पीठीकाग्र । सहस्रकरकोटदीप्ती ॥३२॥ सेवा करिती त्रैलोक्येंद्र । अष्टद्रव्य सुगंधकर । सूर्यकोटीत्ये प्रभाभार । दिव्य सुंदर श्रीमंडित ||३३|| सर्व संदेह विनाशक । दिव्यध्वनि ते प्रकाशक । दुंदुभीनाद अनुहस्तक । आनंद त्रैलोक्य मंडित ||३४|| इंद्रनागेंद्रादि चंद्रार्क | नरेंद्राद्ये भूमींद्रलोक । निग्रंथादी चतुर्थेक | भव्यलोक स्तवन करिती ॥ ३५ ॥ शोभा चौतीस अतिशय । चारी दिशेसी चतुष्टय | श्री अनुपम लोकत्रय । शोभती प्रातिहार्य अष्ट ||३६|| ऐशापरी देव शोभला । सिंहासनावरी देखिला । पणिक श्रेष्ठी आनंदला । करिता जाला विपरीत्य || ३७ ॥ अष्टविध पूजा करोनी । जयमाळारती देवाचरणी । स्तवन स्तोस्त विनवणी । गंधोदक वंदोनी बैसती ||३८|| धर्म ऐकिला सुखदाता । दीक्षा मागे स्वामी नाथा । कृपा करो मज अनाथा । शरणागता तारक तूं ॥३९॥ जानोनिया भव्यजीवात । दीक्षा दिधली विधीयुक्त । क्रिया समस्त सांगे त्यात । ज्ञानवंत तो तपसिंधु ॥४०॥ एकाकी एकलविहारी । पणिक मुनी वनांतरी । गंगा उतरे पैलतीरी । नावेंभीतरी बैसला ॥४१॥ नदी अथक जीवनी । तारू चालला मध्यस्थानी । नाव फुटकीसी सिरे पानी । गले पळोनी ते उतारे ||४२ || तोय भरता त्या नावेत । मुनी बुडे कंठपर्यंत । उपसर्ग तेथ होतात । स्वामी ध्यानस्थ सिद्धरूपी ॥ ४३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org