________________
प्रसंग एक्केचाळीसावा : ५४१
सर्व संन्यास घेवोनिया । धर्मध्यानी बैसोनिया । मेरूसमान अचलकाया । तपश्चर्या मासोपवासी ||२०|| असो श्रावक द्वारकेचा । वैर धरोनी स्त्रीभोगाचा । मार्ग धरिला गिरनारीचा | पावला स्वामीचा आश्रम ॥२१॥ क्रोध धडकला शरीरी । लोहखीळे ते खीळि भारी । सांदोसांद त्या बधन करी । बावीसापरी परीसह सोसि ॥ २२॥
तदा त्या गजकुमारान । दृढ धरिले धर्मध्यान । सोसु कर्माच उसन | पुढती अझुन काय करी ॥२३॥ सर्व संन्यास करोनिया । धर्मंध्यानी समाधिया । अंतःकाळ साधोनिया । पावोनिया स्वर्गसौख्यासी ||२४||
अहो हो चित्रचारितं । भुवनत्रई ते पवित्र |
परीषह भोगिता गात्र । सुख सर्वत्र इंद्रपद || २५ || कथा ॥ ५९ ॥ यानंतरे श्री जिनराया । नमस्कार युगुळपाया । पनिकाख्यान श्रोतिया । श्रवण त्वया करावे भावे ||२६||
पनीश्वर ग्राम अनुपम । महीपाळ राजा उत्तम । राज्य करी पुरुषोत्तम । रयत आराम पाळितसे ॥२७॥ तेथे श्रेष्ठी सागरदत्त । पणिका सुंदरी गुणवंत | तया पुत्र असे धर्मवंत । पापरहित पणिक नामा ||२८|| एकदा तो पणिकज्ञानी । वर्धमान समोशरणी । तेथील शोभा ते पाहुनी । हेमरत्नी कलशतोरण ॥ २९ ॥ मानस्तंभादि तुंग विस्तीर्ण । तुर्यदिशी शोभायमान | खातिका शुद्ध जल संपूर्ण । सुवासपूर्ण पुष्पवाटी ॥ ३० ॥ अशोक वृक्षाच्या पंगती । गंधकुटीमध्ये शोभती । कनकवर्ण रत्नदीप्ती | चंद्रकांतीते छततय ॥३१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org