________________
प्रसंग चाळीसावा : ५३५
1
मग तो गृहासी येवोनी । बोलाविली सुभद्रा राणी । तत् पुत्र तो श्रेष्ठ सद्गुणी । त्या समर्पोनी गृहस्थिति || ४४ || दत्वा श्रेष्ठीपदं शीघेन । सोडिले मोह माया धन । सर्वाशी क्षमाभाव त्यान । असो संपूर्ण अम्हावरी ||४५ || माता वदे रे निजबाळा । मज टाकोनी सकुमाळा । जाउ नको रे बा वेल्हाळा । सर्व कोल्हाळा करताती ॥४६॥ समजावोनी पुनमाता । स्त्रियापरिवारसमस्ता । समताभावे वनातौता । गेला त्वरिता धर्मभावे ||४७ ॥
नमोस्तु केला श्रीगुरूशी । शरण आलो त्वत् पदासी । उद्धरावे मज दीनासी । चरणापासी ठाव द्यावा ॥ ४८ ॥
दयावंत ते गुरूराय । केला दीक्षेचा महोछाव | सूरमंत्र त्या कर्णद्वय । मुनीराय त्या सांगितला ॥ ४९ ॥
जगोपदेशाषि पुस्तक । दिधले श्रीगुरूनायक । पिछि दिधली त्या हस्तक । झाडोन भूमीके निद्रार्थी ॥ ५० ॥
कुमता सौच्याचे कारण । उष्ण तोय त्या परिपूर्ण । दीर्घ लघुशंका करोन । पदप्रक्षाळन करावे ॥५१॥
ब्रम्हचर्य व्रत दिधले | अणुव्रत पंच सांगितले । महाव्रतासी श्रवन केले । सांगितले दशलक्षण ॥५२॥
श्रवन केली सप्त तत्त्व | सोळाकारण भाव सर्वं । ग्यारा अंग ते चौदा पूर्व । त्रैलोक्यभाव षट्काळादी ॥५३॥ पंचज्ञान ते विचक्षण । सर्वविद्यादी पूर्वपुण्य | धर्मवत्सल सावधान । कर्मखंडन करिताती ॥५४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org