________________
५३४ : आराधना-कथाकोष स्वामी नावडे दुष्ट स्त्रियासी । धर्म ना रुचे त्या मानसी। ना ऐकावे त्या वचनासी । मौन मानसी धरावे हो ॥३२॥ माता तयासी न मानी । नीतीपुत्र तो धरी मनी । मनचे मनी समजोनी । दुज्या बोलोनी पुसतसे ॥३३॥ तव सूपकार सांगे गुप्त । भोजनवेळे यावे येथ । कृपा करोनी बाळकात । तारावे आप्त अनाथासी ॥३४॥ स्वामी ऐकोनी मम मानसी । संतोष जाला हृदयासी। ऐशा उत्तम पुरुषासी । पहावे मानसी हे इच्छा ॥३५॥ तेव्हा ते सुनंदया धात्र । सांगे पूर्वाच सर्व सूत्र । सुकोशल ऐकता गात्र । रोमांचे सर्वत्र जाहला ॥३६॥ त्रिधा वैराग्य त्या उत्पन्न । धिक् धिक् म्हणे हे जिन । दुष्ट स्त्रियचे संगतीन । कर्म भोगन येईल ॥३७॥ आता असो ते सर्व काही । उत्तम पुरुष पाहू सही । प्रपंच टाकोनी सर्वही । चालला विदेही होवोन ॥३८॥ जैसा रणचेत्वारिवीर । हस्तकी घ्यावे म्हणे सीर । रणांगणी तो धीरवीर । जितोनी वैर जै पावती ॥३९॥ तैसा तो सकुमाळ बाळ । टाकी सर्व घरजंजाळ । जावोनीया श्रीगुरूजवळ । द्वैपदकमळ नमोस्तु ॥४०॥ आसीर्वाद ऐकोनी चित्ती । सद्गुरूशी करी विनती। मज तारावे धर्मयुक्ती । ज्ञानस्फूर्ती देवोनिया ॥४१॥ ज्ञाननिधी ते मुनीश्वर । धर्म सांगोनी सारासार । द्विधा सागार अनागार । सर्व प्रकार श्रुतज्ञान ॥४२॥ तो जानोनिया आत्महित । ज्ञात्वा सद्भाव मुनींद्रोक्त । संतोष जाला हृदयात । स्वस्थचित्त तो गुरूपाशी ॥४३॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org