________________
प्रसंग चाळीसावा : ५३३ ऐसे संबोधिता तयासी । मौन धरी सिद्धार्थ ऋषी। मग त्या पावल्या शांतिसी । गेल्या गृहासी आपुलाल्या ॥२०॥ पुत्रवृद्धी पुण्यानुसार । जैसा तो द्वितीयेचा चंद्र । रूपशोभा रुक्मिणीपुन । विद्या सर्वत्र सिकला तो ॥२१॥ तारुण्य आणि पुण्यवंत । आरोग्यकाया लक्ष्मीकांत । सोयरे मिळोनी समस्त । कन्यालग्नाते महात्सवे ॥२२॥ वडिलाचे पूर्वपुण्य । चाल चालले त्याचि प्रमाण । बत्तीस स्त्रिया सद्गुण । पूर्वपुण्ये सर्वसुखी तो ॥२३॥ पुण्ये सुंदर स्त्रिया होती। आरोग्य कायाधन संपत्ती । संतत आणि गुरूभक्ती । वाढति कीर्ति धरातळी ॥२४॥ देव गुरू शास्त्र अभ्यास । नवविधा पुण्य घडे त्यास । चार दानाचा सायास । इच्छाभोजनास स्वहस्ते ।।२५।। पुण्य पुण्य जोडी जोडती । विविधा संपदा भोगिती। तीर्थयात्रा ते करताती। सुखी असती गृहाश्रमी ॥२६॥ एकदा सुकोशल जननी । भार्या धात्री सर्व मिळोनी । मांडीवरे उभे राहोनी । शोभा नयनी पाहताती ॥२७॥ तत्समयी सिद्धार्थ श्रीगुरू । देखिले भवसागर तारु । पुसे मातेसी तो विचारू । कोन दिगंबरु हा आला ॥२८॥ सर्वही पाहती तयासी । माता सांगे त्या पुत्रासी । कोन्ही रंक आला नगरासी । काय पुससी तू बाळा रे ॥२९॥ मातेचे ऐकोनिया वचन । ऋद्धिवंत रंक कोठोन । सुनंदा धात्रीबाईस म्हणे । निंदावचन बोलू नये ॥३०॥ अहो बाई हा मुनींद्र । आपुला दिसे कुळचंद्र । ते ऐकोनिया खूननेत्र । वारिली धात्र सुनंदाते ॥३१॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org