________________
५३२ । आराधना कथाकोष
मुनी म्हणे ऐका वचन । जैनधर्मी निश्चयकरण । कुदेवपूजा दुःख दारुण । द्यावे सोडोन कुदेवासी ॥८॥ या सप्तमासा मध्यंतरी । गर्भ संभवेल उदरी । ते ऐकोनी सर्व नारी । धर्म अंतरी निश्चयेसी ॥९॥ तत: कोन्हे एके दिवसी । गर्भोत्पन्न जयवंतीसी। सुकोशल नाम तयाप्रती । आनंद सर्वासी जाहला ॥१०॥ एके दिवसी त्या श्रेष्ठीन । स्वपुत्राचे मुख पाहोन । नयंधर मुनी विनऊन । दीक्षा घेवोन बैसला तो ॥११॥ जयवंतीन ऐकोनिया । क्रोध उत्पन्न सर्व स्त्रिया । मुनीसमीप जावोनिया । परीसह तया दुःस्सह ॥१२॥ ऐसे करणे होते तुम्हासी । तरी का धेनु गोविल्या फासी । चाला आपुल्या गृहासी । चौथ्या आश्रमासी घ्या दीक्षा ॥१३॥ अहो हो स्वामी मुनीराय । दीक्षेची न पाहती सोय । बत्तीस स्त्रिया तारुण्यवय । टाकू नये वोक्यासरीसे ॥१४॥ मुनी वदे ऐकावे बाई । आम्हासी श्रृत नाही काई । नूतन दीक्षा याच ठाई । गुरूचे पायी घेतली म्यां ॥१५॥ बाई चोयांशी लक्षयोनीत । नरदेहदुर्लभप्राप्त । त्यातही स्त्रिया जन्म होत । दुर्लभ ह्यात पुरुषत्व ॥१५॥ जरी नर पुरुष जाला । कुळोत्तम दुर्लभ त्याला । जैन धर्म त्याला लाभला । दुर्लभ जीवाला दीक्षा हे ॥१७॥ बाई दीक्षा पुण्यपावनी । सर्वसुखाची हे ठेवनी । नेमिनाथ बाळत्वपणी । दीक्षाग्रहन लग्नसमयी ॥१८॥ बाई चितेसी न करण । पुत्रावरी दृष्टिसी देन । करावे त्याचे प्रतिपाळन । सुख समाधान सर्वासी ॥१९॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org