________________
५३६ । आराधना कथाकोष
जयवंती त्याची माउली । आर्त्तध्यानानें मृत्यु पावली । तिर्यंच योनि प्राप्त जाली । जन्म पावली क्रूरयोनी ॥ ५५ ॥ व्याघ्री जाली पापप्रभावे । तीन पिल्ली जाली उद्भव | देवधर्म टाकिती जीव । कुगति भव जन्म घेती ॥५६॥
तदा तो मुनी कर्मयोगेन । मौदगिल्ल पर्वत महाविस्तीर्णं । मागधदेश तपोवन । धरिले ध्यान घोर तपेसि ॥५७॥
चातुर्मासोपवास करी । पूर्णयोग जगदोधारी । पारणे करून जावे नगरी । तत् देखिला नेत्री व्याघ्रीन ॥ ५८ ॥
पूर्व वैर ते संबधेन । व्याघ्रीस क्रोध तो उत्पन्न । तत् काया करी भक्षण । चौध मिळोनी तोडताती ॥५९॥
परीसह साहे तो मुनी । धर्मध्यानादी शुक्लध्यानी । जव जव भक्षिते व्याघ्रीनी । तव तव ध्यानी समाधिस्थ ॥६०॥
धर्मध्यानी मृत्युसमाधी । सर्वार्थसिद्धी पिता सिधी । दोघे बैसले सुखाब्धी । नानाविधी भोग भुंजान ॥ ६१॥
सुकोशल यात्रा करोन । आयुष्यांती मधे भुवन । राज्ये कुळी तप करोन । मोक्षमार्गान जातील ॥६२॥
ते व्याघ्री पाहे नयनेन । तत् करि चारु लांछनेन । दृष्ट्वा करिता त्या भक्षण । जातिस्मरन जाल तिसी ॥ ६३ ॥ जानोनी पापाचा तो भार । संसार दुःखाचा डोंगर । सांडोनिया सुधर्माचार | चौन्यांशी फेर भ्रमति प्राणी ॥ ६४ ॥ धिक् धिक् मम उत्पत्ति । आर्त्तध्यान प्राज्ञ दुर्गती । धिक् संसार निंदाकृती । संन्यास प्राप्ती मृत्यु तीसी ॥ ६५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org