________________
प्रसंग एकोणचाळीसावा : ५२९
पुण्यप्रभावे धनधान्य । सुसंपदा सुखसंपन्न । पुत्रमित्र कलत्र सगुण । रूपयौवनभरमंडित ॥१९६।। सत् बांधवान् सुखसंपत्ति । नाना वस्त्र दिव्य शोभती । रंगीत महाल दिसताती । माडीवरौती सप्तताल ||१९७॥ रथहस्ती सोकाअसन । मानसन्मान सुभूषण । रूपवत्या स्त्रिया षड्गुण । जिनभाषित पुण्यप्राप्त ॥१९८॥ तस्मात् त्यक्त्वा कुमिथ्यामत । सद्धर्म दृढ हृदयात । द्रव्य खर्चा सप्तक्षेत्रात । पुण्याचे पर्वत जीवासी ॥१९९॥ सुपात्रदान चतुर्विध । मनइच्छित आहार शुद्ध । पुण्य जोडावे नवविध । भाव त्रिशुद्ध धरोनिया ॥२०॥ पूर्व पुण्य करोनिया । सकुमाळ सुखी स्वठाया । तत् मामा गणधराचार्या । ज्ञानवर्या सिद्धान्तमत ॥२०१॥ अवधी जानोनीया तेन । सकुमाळ आयुत्रिदिन । उद्यानवनात येवोन । प्रतिष्ठापन योग धृत्वा ।।२०२॥ यशोभद्रा जानोनी मात । निवारीले तया मुनीत । प्रज्ञप्ति विद्या असे त्यात । उर्ध्वपंथे पठन करी ॥२०३।। सकुमाळ ते ऐकोनिया । जातिस्मरण जाल तया । मुनी पाश्वं तो जावोनिया । नमोस्तु पाया त्रिशुद्धीन ॥२०४॥ आशीर्वाद मुनी वदत । तीन दिन आयु तुम्हात । वेगी घेवोनी दीक्षेत । आत्महित स्वर्मोक्षदायी ॥२०५।। ते ऐकोनिया सकुमाळ । त्वरित दीक्षा गुणोज्वळ । धर्मध्यान हृदयकमळ । संन्यास सकळ तपस्वी ॥२०६॥ तेव्हा पूर्व वैर करिता । अग्निभूती सोमदत्ता। निदानबंध पादघाता। भ्रमत भ्रमता वैर साधी ॥२०७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org