________________
५२८ । आराधना - कथाकोष
कोठड्या भरल्या अपार । संपत्तीचा अंत ना पार । आश्चर्य करी सौदागर । वारंवार संपत्ती पाहे ॥ १८४ ॥ तव ते पीतांबर सोळा । द्विभाग करी ते वेल्हाळा । नेसल्या त्या द्विषोडशबाला । एक वेळा नित्य नवे नवे ॥ १८५ ॥ पितृ इंद्रसंपदा भोगी । अवधिज्ञान पुत्रालागी । इंद्रदत्त संपदाते भोगी । पुण्यानुरागी सर्वसुखी ॥ १८६॥ एकदा साळुंकी पक्षीण । राजमंदीरी ये त्वरे करोन । पाद पीत चंचू रक्तवर्णं । गवाक्षसदन बैसली ॥ १८७॥ मंजुळस्वरे बोले वाणी । राया ऐक चित्त देवोनी | तुझे ग्रामात एक प्राणी। इंद्रभवनी इंद्र जैसा || १८८ || काया जेवि कर्दळीगाता । पीतवर्णं सुवर्ण प्रभा ।
दिव्या देवांगना स्त्रिया शोभा । मंदिरी आभा रत्नमय ॥ १८९ ॥
शोभा देखोनिया ऐसी । सांगावया आले तुजसी । चाल दाखविते तुजसी । हर्ष मानसी निघे त्वरा ॥ १९०॥
राजा चालला पाहे त्यात । सकुमाळ देखिला अवचित । जेवि रत्नप्रभा उद्योत हारिप्रियासूत त्यापरी ॥१९१॥
1
ऐसा पाहे भोजमवेळा । आश्चर्य करी हृदयमेळा | मातेसी पुसे राव भोळा । ते सांगे सोहाळा पुण्याचा ॥१९२॥ भोजन जालियानंतर । हौद भरले पूर्ण ते नीर ।
जलक्रीडा मनोहर । राजेश्वर सहित क्रीडती ॥ १९३॥
राजमुद्रा पडली तेथ । राव पाहे त्या जळातौत । त्यात आलंकार समस्त । नित्य नित्य त्याग करिती ॥ १९४॥ पाहोन राजा आश्चर्य करी । पूर्वं पुण्याची हे सामग्री । भव्य जानोनिया अंतरी । कैशाही परी पुण्यार्चना ॥ १९५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org