________________
प्रसंग अडतीसावा : ५२५
अहो हो श्री पूज्य ऐसे ज्ञान । सांगा जीवाचे पूर्व पुण्य । राजपृच्छा अमृतासमान । सभाजन संताशांतरि ॥ १४८ ॥ मुनीराज अवधीज्ञानी । मधुरगिरा केवळवाणी । पूर्वं भवांतर कहानी । पापखानी तो वायुभूति ।। १४९ ।। मुनी निंदादि पापभोग । नानादुःख भवाब्धिरोग । नरतिर्यंचाच भोगमार्ग । नाना उपसर्ग दुःखाचे ॥ १५० ॥ श्रवण होता राजा अंतरी | पश्चात्ताप हृदयांतरी । क्रोध मान माया हे चारी । जन्मांतरी दु:खाचे कारण ॥ १५१ ॥ धिक् धिक् आता संसार । वैराग्य उद्भव अंतर । बोलाविला विजयी पुत्र | राज्यभार समर्पिला ॥ १५२ ॥ श्रीगुरूसी नमस्कारुनी । दीक्षा घेतली भवतारणी । नागशर्मा ब्रह्मज्ञानी । करी विनवनी मुनीराय ॥ १५३ ॥ क्षमा करा सर्व अन्याय । दयावंत श्री स्वामीराय । द्यावे मजसी दान अभय । सुधर्म उपाय दाखवी ।। १५४ ॥ धर्मामृत श्रवण केले । विधा वैराग्य उद्भवले । संन्यास ग्रहण घेतले । तप करू लागले दुर्धर ।। १५५ ।। आयुष्यांती अच्युतस्वर्ग । देव जाला मोक्षाचा मार्ग | नागश्रियसी तोचि मार्ग | अच्युतस्वर्ग देव जाला ॥१५६॥ अहो भव्य हो जगीसार । गुरू चिंतामणी तो धीर । तयाचे प्रसादे कर्मे दूर । सुखमंदिर जीवासी प्राप्त ॥ १५७॥ अग्नि मंदरगिरीवरी । सूर्यमित्राग्नी भूत्तपकरी । घातिकर्माचा क्षय करी । केवळांतरी ज्ञानोत्पन्न ॥ १५८ ॥ जग उपदेश करोनिया । प्राप्त मोक्ष अक्षय ठाया । प्रकारे श्रीदेवराया | करावी माया लघुचंद्राची ॥ १५९ ॥
तत्
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org