________________
५२४ : आराधना कथाकोष
तुझ्याजवळ ते येईल । तरी ते तुझी म्हणबील । आमची आम्हापासी राहील। सत्येच बोल बोलावी तू ॥१३६।। बोलाविता ते तो न जाय । द्विज म्हणे हे काय हे काय । त्वरीत रुदित तो जाय । राजसभा फिर्यादी ॥१३७॥ चंपापुरी चंद्रवाहन । तया द्विज सांगे गा-हाण । माझी कन्या घेतली हीरोन । नग्नमुनीन बळकारे ॥१३८॥ ते ऐकोनिया सर्वजनी । आश्चर्य करी अंतःकरणी। कोठे आहेत सांग मुनी । चला वनी जाऊ सर्व ।।१३९॥ राजा श्रावक मिळोनिया । नमोस्तु केला मुनिपाया। आसिर्वाद घेवोनिया । मुनिराया अवलोकिती ॥१४०।। द्विज करितसे पुत्कार । माझी कन्या द्यावी सत्वर । मुनी वदे रे तू गवार । वारंवार वाद करिसी ॥१४१।। हे कन्यका महासद्गुण । चतुर्दशविद्या परिपूर्ण । सिद्धान्तज्ञान ते संपूर्ण । नृप ऐकोन पृच्छा करी ।।१४२॥ कन्या मुखोद्गत सरस्वती । श्रवण करू पुण्यकीर्ती । गुरू तो सूर्य मित्र कीर्ति । कन्येप्रति सुचेनार्थदा ॥१४३॥ जगचित्त महासंशय । तिमिर अंध:कार हृदय । जिनवाणी जानसूर्य । प्रकाश होय ग्यारा अंग ॥१४४।। मुनी सांगे पूर्वील खूण । वायोभूती जातिस्मरण । संपूर्ण ते सिद्धान्तज्ञान । होता श्रवण राजाश्चर्य ।।१४५।। नागश्रिया ते सप्ततत्त्व । षड्द्रव्यादि ग्रंथ पूर्व । मतिशृतिअवधि वैभव । ज्ञानार्णव केवळवानी ।।१४६।। वाणी रसाळ प्रियंकर । जनमन रंजन सुंदर । विस्मित जाला नरेश्वर । मुनीश्वर प्राथिला भावे ॥१४७।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org