________________
प्रसंग अडतीसावा : ५२३ पिता म्हने कन्ये ! आइक । व्रत आताच ठेवी नीक । मग तुजसी तो आनिक । देईल बालिके नग्नमुनी ॥१२४॥ तेथोनी नागश्री चालता । तोचि नर देखिला अवचिता । बंधन केले पुष्टिहस्ता । पुसे वनिता त्या नागश्री ॥१२५॥ वाणीपुत्र नारद मजसी । गाली देती जनही मजसी। काही नाही वो मजसी । पापि मजसी गांजितात ।।१२६॥ एकदा राजाने ऐकिले । लटकेचि मला बंधन केले । राव कोपायमान जाले । छेदा म्हणाले कर-पाद-जिव्हा ॥१२७॥ एक बाई त्याच दोषान । पापी ताडिती मजकारण । शष तरी कबूल होन | नाहीच म्हणे पूर्ववत् बुधैः ॥१२८।। अहो हो चोर परद्वारी । पापलोभ त्याचे अंतरी। तत् व्रत टाकू कैशापरी । जन्मजन्मातरी सुखदाता ।।१२९।। नागशर्भा म्हणे वो कन्ये । काए वर्णिसी व्रत साहणे । हे मुनीस देई जावोन | माझे वचन सत्य करी ॥१३०॥ नागश्री म्हणे पितियासी । मी न टाकीन या व्रतासी । दुर्जन गांजिती मजसी । सज्जन आम्हासी तेच होती ।।१३१।। द्विज क्रोधाग्नि होवोनिया । स्वामी सन्निध जावोनिया । अरे रे मुने नगत्वया । मम कन्या तुवा भोंदिली ॥१३२।। व्रत दिधल त्वा आपुल । ब्राह्मण कर्म बुडविल । क्रोधान अद्वातद्वा बोल । कुबुधी बुडाल जीवापायी ॥१३३॥ व्रतशीळ ते महाथोर । त्यास टाकिती जे नर । धर्म त्यजोन कर्मा सादर । तेच पामर दुःख भोगी ॥१३४॥ सूर्यमित्र म्हणे ब्राह्मणा । हे तो माझी सत्यकन्या । माझी म्हणतोस तुफान्या । बोलावी कन्या आपली तू ॥१३५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org