________________
५२२ : आराधना-कथाकोष
तत् बंधु वायुभूती जीव । सम्यक्त्व अणुव्रत वैभव । शुभ कुळी जन्म अपूर्व । सुख सर्व पुण्यवंतासी ॥ ११२ ॥ ते श्रवन नागस्त्रियसी । नमोस्तु केला गुरूचरणासी । जिनगुणसंपत्ति व्रतासी । द्यावे मजसी श्रीसद्गुरु ॥ ११३ ॥ व्रत आशीर्वाद घेवोन । कन्या गेली आपुले स्थान । द्विजकन्यालोक मिळोन । वर्तमान पित्यासी सांगे ॥ ११४ ॥ तो नागशर्मा द्विजवर । म्हणे कन्ये ऐक उत्तर । ब्राह्मणकुळ महाथोर । व्रत मुनीवर योग्य नोहे ॥ ११५ ॥ जैनधर्मी गुरू टाकावा । वेदांग उपदेश घ्यावा । ते ऐकोन कन्येचे जीवा । पितृभावा तास मानित ॥ ११६ ॥ अहो तात काय बोलले । आत्महित व्रत म्या घेतले | कैसे टाकावे परबोले । तजवेल निश्चय जाना ।। ११७ || तत् क्रोध आला ब्राह्मणासी । करी धरिले स्वपुत्त्रीसी । चाल वेगी तू मुनीपासी । पुसेन त्यासी रीती नीती ॥। ११८ ।। मार्गी चालता दोघेजन । तव देखिले दृष्टकारण |
एक्या पुरुषाशी बंधन | सुळारोपण करावयासी ॥ ११९ ॥
पुढे कुवाद्ये वाजताती । जन कोल्हाळ करिताती ।
|
ते पाहोन कन्या त्याप्रति । जाली बोलति काय रे सांग ॥ १२० ॥ तुजसी जालेसे बंधन | याचे सांगावे कारण । ऐकोनी बोले वरषेण । आमच धन नेलं म्हणती ॥१२१॥ मज कष्टवितो वाणिकपुत्र । राजकिंकर जग सर्वत्र । धन नाही म्हने वगत । निश्चय मात्र त्याचे अंतरी ||१२२ ॥ जावो गेला तरी प्राण । तो न सोडी आपुले मान । व्रत दत्त मुनीश्वरान । मी न टाकीन बापराया ।। १२३।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org