________________
प्रसंग अडतीसावा : ५१९ मुनिक्रिया ज्ञान संपूर्ण । शास्त्राभ्यास सिद्धान्तज्ञान । ग्यारा अंग चौदा पूर्व । अभीक्ष्णज्ञान जाल त्यासी ॥७६।। गुरूची आज्ञा घेवोनिया । एकलाविहारी होवोनिया । कौशांबीनगरा जावोनिया । तपश्चर्या करीतसे ॥७७॥ आहारचर्या करावयासी । नगरात आले ते तपस्वी। अग्नीभूती मंदिरासी । पंचमुद्रेसी धरोनि यवौ ॥७८॥ अग्निभूतीन तयात । भक्तीयुक्तीन पडधावित । . निरंतर जाले गुरू तेथ । तुर्यदमात आशीर्वाद ॥७९॥ अन्नदान जगती सार । सर्व सुखाचे ते मंदिर । सुपात्रासी भावे आहार । देति तर त्यासी मोक्षमार्ग ॥८०॥ तत् वायुभूति लघुभ्राता । क्रोध उत्पन्न तया चित्ता । याने आमच्या अनहिता । ब्राम्हणत्वासी टाकिले ॥८१॥ तयासी न करी नमन । निंदा द्वेषे दुर्वचन । बोल बोले महाकठीण । ते बंधून ऐकिले सर्व ॥८२॥ अग्निभूति म्हणे बंधुसी । निंदाकर्म पापाची रासी । निदेने दुर्गति जीवासी । पापरासी न करावी सख्या ॥८३।। गुरूपासी अग्निभूतीन । सुधर्म ऐकिला संपूर्ण । त्रिधा वैराग्य त्यासी उत्पन्न । मोक्षसाधन मागे स्वामिसी ॥८४॥ गुरूराय कृपा करोनी । दीक्षा दिधली भवतारणी । क्रिया सिद्धान्त जिनवानी । तपे तरणी सूर्यासमान ॥८५।। अग्निभूतीची जे का प्रिया । सोमदत्ता सती ते जाया । चित्ती दुःखी होवोनिया । सांगे तया वायुभूतीसी ॥८६॥ अहो तुम्ही आमचे दीर । मुनीसी न केला नमस्कार । निंदा केली तयाची थोर । मम भ्रतार पश्चात्तापासी ॥८७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org