________________
५१८ । आराधना-कथाकोष
राजाने मुद्रिका दिधली । ते सरोवरात पडली । जळामध्ये तळास गेली । ते देखली जाला भयभीत ॥६४॥ जिनमंदिरासी जावोन । देवाधिदेवा करी नमन । सद्गुरूपासी येवोन । पंचांग नमोस्तु करी ॥६५॥ सुधर्मकीर्ती मुनीश्वर । अवधिज्ञानी दयाकर । तयासी सांगे जळांतर । मुद्रिका कर पडती स्वामी ॥६६।। अवधिज्ञाने ते पाहिली । भूमी कमळाग्रे बैसली । प्रातःकाळी उगवली । वन्हे आली कमळकळया ॥६७।। तुवा प्रातःकाळी जावोन । मुद्रिका घेई करांगुळीन । ते ऐकोन सूर्या मित्रान । प्रातःस्नान तेथे गेला ॥६८॥ चारी दिशा अवलोकून । पाहिला स्नानाचा ठिकान । पुरोहित करि प्रातःस्नान । करिता नयन देखे मुद्रा ॥६९।। करांगुळी घालोनी तया । संध्यावंदन करोनिया । स्वामीपासी येवोनिया । नमन पाया भावयुक्त ॥७०॥ जोडोनिया तो द्वयकर । विनय करी वारंवार । मम मस्तकी ठेवावा कर । पुढील होनार ते विद्या सांगा ॥७१॥ तयाचे उत्तर ऐकोनी । हे ज्ञान ते दीक्षेवाचोनी। जैनधर्मप्रकाश करूनी । अवधिज्ञानी होशील ॥७२॥ स्वामी म्हणे सूर्यमित्रासी । विद्या शिकला गुरूपाशी । तैसीच विद्या धर्मराशी । शिकशी तरीच येईल ॥७३।। विद्यालोभ धरी अंतरी । दीक्षा मागे तो जैनेश्वरी। संन्यास घेवोनि लौकरी । गुरूमुद्रा धरी सूर्यमित्र ॥७४॥ पुनः पुनः गुरूपासी । मुनिक्रिया सांगा मजसी । गुरूमुखे ज्ञान आसी । प्रसन्न त्यासी भारती ते ॥७५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org