________________
प्रसंग अडतीसावा : ५१७
श्लोक - यन्नाम - स्मृति-मात्रेन, प्राप्यते सारसंपदा । तं प्रणम्य जिनं वक्षे, सुकुमाळकथां मुदा ॥५२॥ कौशांबी नगरी ते विख्यात । अतिबल राजा पुण्यवंत । सोमश्रमा तो पुरोहित । ज्ञानवंत सुविचक्षण ||५३ || काश्यपी कामिनी तयास । वंशी जन्म जाला पुत्रास । अग्निभूति वायुभूतिस । सप्तवरुषे विद्यायोग्य ॥ ५४ ॥ ते दोघे पुत्र प्रमोदन | विद्या न ये तयालागुन । पूर्वी नाहीच केले पुण्य । मुखोत्पन्न कैचि भारती ॥ ५५ ॥ श्लोक - पूर्वदत्ते या विद्या, पूर्वदत्तेसु या भार्या । पूर्वदत्तेसु यं धनं, अग्रे धावति धावति ॥५६॥ सोमश्रमा तो पुरोहित । काळव्याळेन तो ङौंसित । मृत्यु पावोन शोकशांत । दिन बहुत जाले त्यासी ॥५७॥ गोत्रज सर्व मिळोनिया । पुरोहितपद हिरोनिया । मूर्खासी दान मान माया । केउत तया धन प्राप्त ॥५८॥ सभेत मानभंग जाला । गेले राजगृहनगराला । सूर्यमित्र चुलत्यासी केला । वृत्तान्त जाला तो सर्वही ॥ ५९ ॥ सूर्यमित्र तो ज्ञानसिंधु । केला पूर्ण तयासी बोधु | विद्या सीकवि नानाविधू । शास्त्रसिंधू व्याकर्णादिक ॥६०॥ विद्या शिकला पितृपाशी आला आपुल्या स्वगृहासी । स्वविद्या भूपतिपासी । पढे सभेसी पुरोहित ||६१ || तो राजा ज्ञानी अतिबळ । दिल्हे पुरोहित पदस्थळ | पढे बृहपति कोवळ | राजा दयाळ तुष्ट मानसी ||६२|| एकदा राजगृहप्रदेशी । सरोवर पाळि तीरासी । संध्यायां अर्ध्य सूर्यासी । देता तत्वडिसी काय जाले ॥ ६३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org