________________
५१६ : आराधना कथाकोष
तेन ऋषी गुंफा पाहती । कामधेन त्यास देखीली । षड्रस पक्वान्नीपजलि | भोजन केली सर्वांनी ॥ ४१ ॥ | लोभ धरोनिया मनात । राजा पापी इच्छिला घात । कामधेनु धरिता त्यात । क्रोधवंत तो जमदग्नि ॥ ४२ ॥ दोघ युद्धा प्रवर्तले । तापसासी राय जितीले । कामधेनु घेवोन गेले । पापीन केले महत्पाप ||४३॥ रेणुकापुत्र दोघे जन । पुप्प आणु गेले ते वन । येता समजले संपूर्ण । हृदयी क्रोधाग्न पेटला ||४४ || पित्यासी प्रतिज्ञा करोनी । रायासी आनीन बांधोनी । तरीच येईन परतोनी । ना तरी मरणी मारीन ॥४५ ॥ मातापित्यास करी नमना । माता म्हणे पुत्रा निधाना 1 प्रज्ञाप्तिविद्याधरी कर्णा । विजयी रणा होशील तू || ४६ ||
मग तो परसराम बळी । रायासी जावोन करी कळी । ग्रामात जालीसे आरोळी । त्यानि रवंदळ मांडिली ||४७॥ विद्या प्रज्ञप्ति विख्यात । राजा जिंकिला तो क्षणात । पाप्यास कैच यश प्राप्त । अधोगत दुष्टाशी हो ||४८ ॥ परसराम विजयी जाला । अयोध्याराजी तो स्थापिला । कामधेनु घेवोनी आला । तो भेटला मातापित्याशी ॥ ४९ ॥ तो राज्य करी आनंदान । साधुसंता करी पाळन । जैनधर्मी असे निपुन | पुढतीस धन करील तो ॥५०॥ काव्यश्लोक - भवति जगति शूर: पंडितो दिव्यलक्ष्मी - | पति रिहसुखयुक्तः पुण्यपण्येन जीवः ।
इति मनसि विचारं चारुकृत्वा सुभव्याः ।
कुरुत जिनमतोक्तं सारपुण्यं सुखाय ॥ ५१ ॥ इति कथा परसराम || ५६||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org