________________
५२० : आराधना-कथाकोष वैराग्य करोन जाले जती । तुम्ही पापी वायोभूति । आमचे संसाराची शांती । केली दुर्मति तुमचेनी ॥८८॥ ऐसे ऐकोनिया तयासी । क्रोध आला त्याचे मानसी । जाय जाय गे त्याजपासी । नग्नमुनीसी भेटावया ॥८९॥ अशौच तो परद्वारी । त्याची वर्णीसी येथे थोरी । जाय येथोनी झडकरी । लत्ताप्रहरी ताडिली ते ॥१०॥ ऐकोनि त्याची पापवानी । हे निंदा पाप दुःखखानी । पादघात मजलागुनी । भोगिसी योनि दुःखदाई ॥९१॥ मूढ जे निंदा करिताती । आवडी विष भक्षिताती । आप आपना मारक होती । मूढ भोगिती दुःखयोनी ॥९२।। मुनिनिंदा पापे करोन । वायुभूति रोग उत्पन्न । दुर्गंध शरीरी कुष्टेन । दुःख दारुण त्या न सोसावे ॥९३॥ पापभारे करोनीया । कुष्ट दुष्ट भोगोनिया । गर्दभीजन्म घेवोनीया । डोंबारिया घरी गाढव ।।९४।। दुःखे मृत्यु तेथेहि जाला । शूकरी पोटी जीव जन्मला । दुःख भोगिता प्राण गेला । तिर्यचयोनीला महतदुःख ॥१५॥ नरदेही पाप करावे । स्त्रियेचे जन्मासी ध्यावे । हे जानोनिया भव्यजीवे । न करावे पापकारण ॥९६॥ सुकरी मरोनी कुत्री जाली । चंपापुरीमध्ये जन्मली। अंत्यजाघरी स्थिरावली । मृत्यु पावली श्वानी तेथे ॥९७॥ तेथेच चांडाळ कुशीशी । कन्या जन्मली अपेशी । दुर्गन्ध व्याप्त सर्वासी । पिटली बनासी पापीन ॥९८॥ क्षुधापीडित वनवासी । जांभळ खाय पापरासी। अग्निभूती पाहे तियसी । सर्वांगासी महादुर्गंध ॥१९॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org