________________
प्रसंग अडतीसावा : ५०३
काव्य- स श्रीमान् बलभद्रदेवसुमुनी, रत्नत्रयाळंकृतः । श्रीमत् जैनपदाब्जयुग्ममधुलिट चारित्रचूडामणिः ॥ शांतिकांतिमनःप्रसत्तीसहितं नित्यं महामंगलं । दद्यान् मे गुणरत्नरंजितमतिः सद्बोधसिंधुः सुखं ॥६६।।
अथ द्वीपायन द्वारका कथा ॥५२॥ श्लोक-श्रीमत्सर्वज्ञमानम्य, वक्षे संपविधायकं । जनानां प्रतिबोधाय, मद्य-दोष-कथानकं ॥६७॥ एक्या चक्रपुरा ग्रामात । गंगाभट असे नांदत । वेद वेदांग असे पंडित । विष्णुभक्त चरणभुंग ॥६८॥ एकदा दैवयोगे करून । निघाला तो दैवहीन । विंध्याचल वनी येवोन । मन इच्छेन मद्यपानि तो ॥६९।। सप्तव्यसनी विषयिक । कैफी आणि मांसलुब्धक । न जाने विवेकाविवेक । स्त्रिया कामीक रातला तो ॥७॥ ते मातंगी नीच तरुणी । भोग भोगी इच्छेकरूनी । द्विजामध्ये मिसळोनी । पाहता त्यानी दुन्हाविला ॥७॥ मार्ग धरोनिया तयासी । ज्ञानशब्द बोले द्विजासी । मद्य मांस दोष सकळासी । किती मजसी किंचित् ॥७२॥ सर्वही करिती ते कर्म । हा परंपरा इंद्रियधर्म । आनिक तापसी उत्तम । वेदागम आचारवंत ॥७३॥ रे रे भ्रष्ट तूं ब्राह्मण । ज्ञान संपादन करोन । मांस आहारी गंगाजीवन । कामांध नैन मूढ मानसा ॥७४॥ मागुता तो त्यासी भाषला । किचित् दोष लाविता मला । तुम्ही ज्ञानी अमच्या बोला । संभाळ केला पाहिजे ॥७५॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org