________________
५०२ : आराधना-कथाकोष श्लोकद्वय-पुण्योदय सुखी प्राणी, भवेत् दुःखी स्वपापतः । तस्मात् पापं परित्यज्य, पुण्यं कुर्वन्तु धीधनाः ॥५४॥ पुण्यं पात्राश्रितं दानं, पुण्यं श्रीजिनपूजनं । पुण्यः शीलोपवासाद्यैः, भाषितं पूर्वसूरीभिः ॥५५॥ वनवासी बळी नारायण । जरत्कुमार तेथे येवोन । पारधी निमित्य भ्रमण । देखिले दुरून श्वापद ।।५६।। तृषाक्रान्त तो कृष्णनाथ । बळी गेला आणू जळात । वृक्षातळी कृष्ण निद्रिस्त । गुढग्यावरौत सव्यपद्म ।।५७।। पद्यीपद्म जैसा नयन । जरत्कुमार पाहे दुरून । श्वापदार्थी बाण काढोन । विधिला सत्रान पापिष्टे ॥५८॥ जवळ येवोनिया पाहे । वोळ खिला यादवराय । बळिराम आला तत् समय । कृष्णासी पाहे निद्रिस्त ॥५९।। दु:खे होवोनिया भ्रमित । कोड मास संग्रह ते प्रेत । पूर्वमैत्र येवोनी तेथ । प्रतिबोधे त्यात ज्ञान जाले ॥६०। तत् चंदनाद्यै मेळ उन । कोरी भूमिका पाहोन ॥ मान पर्वत विस्तीर्ण । नारायण दहनक्रिया ॥६१॥ त्रिधा वैराग्य बलिदेवासी । दीक्षा घेतली स्वामिपासी। तीव्र उग्र तप तपस्वी । मानतुंगीसी समाधिगुप्त ॥६२॥ देह झाला विसर्जन । महेंद्र स्वर्गी तो उत्पन्न । दिव्यवस्त्र भोग संपन्न । अप्सरा नूतन देवंगना ॥६३॥ विमानारूढ स्त्रीसमेत । मेरू कैलास यात्रा करीत । जावोनी विदेहक्षेत्रात । तीर्थंकरात पूजाविधीन ॥६४।। जिनधर्मे विमानप्राप्त । सर्व सौख्य भोग भोगीत । पुढती नरदेही दीक्षित । मोक्षमार्गात पाहतील ॥६५।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org