________________
प्रसंग अडतीसावा : ५०१ गडगिरिनेरी येवोन । आतापयोग करी साधन । होणार कर्माचे लक्षण । न चुके जान भूतळे ॥४२।। तत् समयी यादवकुमार । क्रीडानिमित्त गिरिवर । खेळता जाले तृषातुर । प्राशिती नीर पर्वताचे ॥४३॥ परतोनी जाता द्वारकेत । मद्यप्राशनी ते भ्रमिष्ट । एकमेका द्वंद करीत । पाहिला तेथ द्वीपायन ।।४४।। त्याचे रक्षण करावया । नमोस्तु केला गुरूराया। हाळि म्हणे कृष्णराया । योवो दे दया स्वामीची वो ॥४५।। छप्पन कोडि यादवेंद्र । उपसर्ग होतील थोर । देऊळाकार करावा त्वर । पाषाण समोर लावियले ॥४६।। मोघोनिया जे येताती । एक एक धोंडा ठेविती । मदारी उपसर्ग करिती । पापाचरती देखावेखी ॥४७॥ मद्यप्राशोनी ते मातले । आपआपना विसरले । एकमेकासी संहारिले । ते श्रुत जाले नारायणा ॥४८॥ मुनिसी उपसर्ग जाला । कृष्णराम धावोनी आला । द्वीपायन मुनी देखिला । प्राण उरला कंठगत ॥४९॥ उपसर्ग साहिले संपूर्ण । समीप येता केवळज्ञान । ततृ समयी क्रोध उत्पन्न । इच्छिले दहन द्वारकेचे ॥५०॥ भुजातून अग्नी कल्लोळ । द्वारका भस्म जाली सकळ । समुदाय कर्म प्रबळ । राहले जुगुळ रामकृष्ण ॥५१॥ हे जानोनी भव्य प्राणी। क्रोध द्यावा तुम्ही टाकोनी। सदा असावे धर्मध्यानी । गुरूचरणी निशिदिन ॥५२॥ बळिदेव नारायण । दोधे जाले क्षीदक्षीण । पापपरिपाके अरण्य । वनवास भोगन जीवासी ॥५३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org