________________
४९८ : आराधना-कथाकोष
श्रीकुमार म्हणे मातेसी । पाप वसे गे तुझे मानसी । पित्याची गती जाली कैसी । लज्जायमानसी गोवळ ती ॥८॥ नानिन तयासी क्रोध करी । पापीन म्हने पुत्रासी मारी। परपुरुषी लंपट भारी । जातील द्वारी नरकाचे ॥९॥ तथा गोवळ राहिला घरी । पापी लंपट पर नारी। श्रीषेणा पित्याचे दुःख धरी । केली मारीया गोवळान ॥१०॥ माता नोव्हे हे डंखीन । तव गोधन सोडली बंधून । भगिनी म्हने तया कारण । सावथान त्वा राहावे बंधू ॥११॥ पिता नाहीसा केला । तुझाही घात बा इच्छिला। आता जीव रक्षी आपुला । शब्द ऐकिला बहिनीचा ॥१२॥ पशु नेले वनांतरे । स्तंभ झाकिला आपुले वस्त्रे । गुप्त राहिला नदीतीरे । पाहीन चरित्र दुष्टाचे ॥१३॥ तेव्हा तो गोपाळ येवोनी । खट्ग हस्त पापी हानी। कुमार पुष्टासी येवोनी । यमसदनी धाडिला वो ॥१४॥ गोधन घेवोन गृहासी आला क्षीर काढायासी। माता पुसतसे पुत्रासी । नंद गोवळासी बोलवी ॥१५॥ तुझ्यामागे तो आला होता । कोठे राहिला सांग पुता । पुत्र म्हणे वनाअतौता । देखिला होता पापरूपी ॥१६॥ मी काय सांगु काय जाला । किंवा सावजान तो नेला । त्याचा सेला होता पडला । तो दाखविला मातेसी पै ॥१७॥ ते ऐकता क्रोध उत्पन्न । धावली मुसळ घेवोन । ते पाहोनिया त्या कन्येन । हस्त धरी दोन्ही मातेचे ॥१८॥ अहो हो माय पुढे पाहे । पुत्राचा घात करू नये । समजाविता समज न ये । काकुळती ये श्रीकुमार ॥१९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org