________________
प्रसंग अडतीसावा
॥ श्री वीतराग प्रसन्न ।।
श्रीजिनं त्रिजगत्स्वामि, सचित-पद-द्वयं । नत्वाहं नागदत्तायाः ; चरित्रं रचयामि च ॥१॥ आभिराख्य महादेशात । नासिक नाम नगरात । वसति गृह सागरदत्त । नागदत्ता गुणवंत प्रिया ॥२॥ श्रीकुमार तत्कुळी पुत्र । श्रीषेणा जन्मली कलत्र । इहि जन्मी पापाचे सूत्र । कुबुधी गात्र विकाईक ॥३॥ नंद गुराखी गृहीचा । नागदत्तेसी छंद त्याचा । रत जाली लोभ विषयाचा । स्पर्श द्रियाचा मद भारी ॥४॥ रोग दुःख त्या दोघासी । न जाय गुरे चारायासी । सागरदत्त ते दिवसी । गोधन वनासी पश्चिमरात्री ॥५॥ नंद गोप खड्ग घेवोनी । गेला निबिड तृणवनी । देखिला निद्रिस्त अरण्यी । यमसदनी धाडिला तो ॥६॥ परस्त्री विषय लंपट । पापी हिंसक महादुष्ट । तदा ते नागदत्ता धीट । गोवळासी स्पष्ट विनोदती ॥७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org