________________
प्रसंग अडतीसावा : ४९९
पुत्र म्हणे माय गे माये । म्या तुझे वो केले ग काय । माझा काही नाही अन्याय । ज्याचा उपाय त्यास फळला ॥२०॥ पापिनी क्रोध आवरेना । मस्तक आपटिले पाषाणा । जीवघात यमसदना । नरकभुवना शीलहीन ॥२१॥
धिक्कार काम - दुराचार । परपुरुषी लंपट नार । दुःखभोग चौन्यांशी फेर । वारंवार शीलही नासी ॥२२॥ श्लोक : - तस्मात् भव्यैः जिनेंद्रद्रोक्तं, शील- शर्म - शत-प्रदं । पालनीयं जगच्चेतो, रंजनं धर्महेतवे ॥२३॥
हे जानोनिया भव्यप्राणी । शील पाळावे यत्न करोनी । सदा असावे धर्मध्यानी । मोक्षसदनी जावयासी ||२४|| श्लोकःशीलं श्रीजिनभाषितं शुचितरं, देवेंद्र वृंदैस्तुतं । शीलं दुःखकलंकपंकसलिलं, शीलं जगन्मोहनं ॥ ये भव्या प्रतिपालयन्ति नितरां नित्यं सुशर्मप्रदं । भुक्त्वा ते विदशादि सौख्य मतुलं, शुद्ध लभन्ते सुखं ॥ २५॥
इति नागदत्त कथा || ५२ ॥
प्रणम्य त्रिजगत् पूज्यं श्रीजिनं शर्मकोटिदं । द्वीपायनस्य संवक्षे चरित्रं मुनिभाषितं ॥ २६॥
श्रीजिनेंद्र सुखदातार । त्यासी प्रणाम वारंवार । द्वीपायन मुनीचे चरित्र । वदेन वगत श्रोतियासी ॥ २७ ॥ द्वारकापुरी ते विख्यात । सोरट देश पुण्यवंत । जन्मभूमी नेमिनाथ | हरिवंशात यादवकुळी ॥२८॥ तत्र श्री बळीभद्र देव । नव नारायण कृष्णराव । छप्पन कोडि ते यादव । श्रेष्ठ बांधव समुद्रविजय ॥ २९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org