________________
प्रसंग दुसरा : २७ मग यवोनि स्वगृहात । रायासी जानविलि मात । न्हवन पूजा उत्सव सहित । केलि त्वरित जिनमंदिरि ॥१४१॥ मग पाचारोनि चतुर नर । राज्ञि वादोनि गूढांतर । अष्टदिशि धाडिले सत्वर । ज्ञानवंत नर पाहावया ॥१४२॥ तितुक्या माजि सेवक । पूर्व दिशा गेला असे येक । तेन्ही अम्रवनी अकलंक । ज्ञाननायक पाहिला ॥१४३॥ अशोक वृक्षाध बैसलासे । सेवाभक्ति करिति सिष्य । अकलंक देव नाम असे । प्रतापे जैसे दिवाकर ॥१४४॥ ऐसे पाहोनि सेवकाने । पुसिले एक्या शिष्याकारने । याहाचे ग्रामनाम सांगने । मजकारने मित्रराया ॥१४५।। मग संदेशा घेवोनि बरा । राज्ञी सन्निध यवोनि त्वरा । पाहला व्रतांत कथिला सारा । यथा रामचंद्रा मारुति ।।१४६।। सेवक वाक्य ऐकोनि राज्ञि । सर्वसंघ सवे घेउनि । महदाडंबरे करोनि । तदाम्रवनि गेला त्वरें ॥१४७॥ पाहोनिया अकलंक देव । वंदना केलि भक्तिभाव । अतिआनंद पावला जीव । पद्मिनि इव सूर्योदइ ॥१४८|| यथा पाहोनि मेघडंबर । नृत्य करिति मयूर । चातक जैसे वर्षता नीर । आनंद थोर मानीतसे ॥१४९।। उक्तंच तस्य संदर्शनात् तुष्टा । सा सती शुद्धमानसा । पद्मिनीवरवेर्मेघा मुनेर्वा तत्वदर्शनात् ।।१५०॥ तदा तद्भक्ति पाहुन । अकलंक देव वदे वचन । देविश्रीसंघ मिळोन । आनंद क्षेम कुशल असा ॥१५१॥ तद्वाक्य ऐकोनि ऐसे । राज्ञि रुदन करितसे । स्वामी अपमाना सरिसे । दुःख नसे त्रिभुवनि ॥१५२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org