________________
२८ : आराधना कथाकोष ऐसे असता कैचे कुशल | चतुसंघ मिळोनि सकल । दुःखपीडित असो प्रबल । चित्त व्याकुल फार असे ॥१५३॥ राज्ञीचे वाक्य ऐकून । पुसे अपमानाचे कारन । जे संघश्री पासून । केले निवेदन ते सत्वरि ॥१५४॥ अकलंक देव ऐकोनि ऐसे । क्रोधे करोनि वदत असे । शून्य गृह पाहोनि जैसे । श्वान प्रवेसे स्वेच्छाचारे ॥१५५॥ हा संघश्री वंदक आज । क्षणामाजि जिकीन सहज । विद्या गर्व करी बेकाज । सांडोनि लाज जगांतरि ॥१५६।। त्या संघश्री वंदकाकारने । मम पत्रिका घेवोनि जाने । स्वदर्प टाकोनि पत्रदर्शने । रथोत्सवा कारने आज्ञा देइल ॥१५७।। ऐसे वाक्य वदोनि त्वरित । राज्ञिचे शांत केले चित्त । आश्वासन देवोनि संघसहित । पाठविले तीस निजमंदिरि॥१५८॥ मग सर्वश्रीसंघ मिळोनि । गीत वाद्योत्सव करोनि । अकलंक देवा लागुनि । आले घेऊनि जिनमंदिरी ॥१५९।। मग राज्ञिने सेवकाहाति । पत्र पाठविले संघश्री प्रति । क्रोधे खवळोनि तो दुर्मति । टाकिले पत्राप्रति फाडोनिया ॥१६०॥ ज्ञानदर्षे वदे दूताकारने । त्वा तयासि जावोनि सांगने । शीघ्र यावे वादस्थाने । आम्हा दाखवे ज्ञान तुझे ॥१६१॥ तद्वाक्य ऐकोनि त्वरे । दूत येवोनि माघारे । तत्कथित वाक्य सारे । नृपासि त्वरे निवेदिले ॥१६२॥ तदा हिमशीतल भूपतिने । अकलंक देवाकारने । महदाडंबरे बैसवोनि याने । स्वसभास्थाने आनिले ।।१६३॥ मग श्रीसंघ यवोनि तैथ । परस्पर पुसति. श्लोकार्थ । वाग्डंबरे वदति व्यर्थ । मार्ग सत्यार्थ न जानति ।।१६४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org