________________
४९२ । आराधना कथाकोष आयुष्यांती त्या दोघासि । दुःख भोगिती नरकवासि । अनंत संसारी जीवासि । शेवटी त्यासि तारू गुरू ॥८९।। हे जानीया भव्यप्राणी । चतुष्कषाय द्यावे टाकोनी । चुकवाव्या दुर्गति योनि । धर्मे करोनी मोक्षमार्ग ॥९०॥ श्लोक : एकेनापि वशीकृतोऽत्र विषयेनोचैर्न रेंद्रात्मजः । संप्राप्तो नरकं च दुःखकलितं हा गंधमित्रः कुधीः । मूढायोऽतु समस्तभोगनिरतः कष्टं न किं यास्यति । सोप्येवं सुविचार्य पंडितजनः श्रीजैनधर्म स्तुवे ॥९१॥ सर्वसौख्यप्रदं नत्वा पादद्वैतं जिनेशिनः । वक्षे गंधर्वसेनाया चरित्रं मूढचेतसः ॥९२॥ श्री जिनेंद्रपद वंदोनी । सर्व सौख्याची ते खानी। तयाचे प्रसादे करोनी । कवित्व करनी करू आता ॥९३॥ पाडळिपुर ते विख्यात । गंधर्वराजा पुण्यवंत । राज्ञी गांधारी रूपवंत । पुत्रीवंत गंधर्वसेना ॥९४॥ यौवनभरा येवोनिया । गंधर्वकला शिकोनिया । शास्त्रज्ञान जालेसे त्वया । गंधर्वविद्या निपुन ते ॥१५॥ ज्ञानगर्व धरोनी चित्ति । प्रतिज्ञा बोले वचनोक्ती । ज्ञाने गायने मज जिती । भ्रतार निश्चिति तोचि माझा ॥९६।। अनेक क्षेत्री कलावंत । वीणा मृदंग वाद्ये सहित । ते तुच्छ केले समस्त । जिकिले समस्त क्षणामाजी ॥९७॥ पोदनपुराख्य श्रीमान । पांचाळराजा कलाप्रवीण । तद्वार्ता शृत स्वकर्ण । शिष्य पंचशत घेवोनी ॥९८॥ उपाध्याय समागत्य । वादार्थी ते आले समस्त । पाटलीपुरी उद्यानात । राहले तेथ समुदाय ॥९९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org