________________
प्रसंग चवतीसावा : ४९१
जेष्ठपुत्र तो जयसेन । द्वितीय गंध मित्र सगुण । सुगंधासी लंपटमन । जैसा कमलीनी भुंग लुब्ध ॥७७॥ एकदा मुनीराज येती । भावरी राजा पुण्ययुक्ती । नवविधा पुण्यउत्पत्ती । उपदेश ऐकती द्विधा पै ॥७८॥ उपदेश ऐकोनी रायासी । त्रिधा वैराग्योत्पत्ती त्यासी । गंधमित्र लघुपुत्रासी । युवराज्यासि स्थापिले ॥७९॥ जेष्ठपुत्रा स्वराज्य दिल्हे । सिंहासनी अभिषेकिले । सागरसेन मुनी पाहिले । त्यासी विनविले भावार्थ ॥८०॥ दीक्षा घेवोनी जैनेंद्री। दमन करितो पंचेंद्री। समाधी धर्मध्यान धरी । स्वमोक्षपायरी तयासी ॥८१॥ गंधमित्र प्रधानपदी । अविचारी तो मंदबुद्धी। जेष्ठबंधुसि वैर साधी । करोनी उपाधि पिटला ॥८२॥ पुण्याविना कैसे सुख । पापे भोगिताती दुःखात । सख्या बंधुसि इच्छी मृत्यु । पाप अद्भुत त्या जीवासि ॥८३॥ गंधमित्र स्त्रीलंपट । जळक्रीडे विषयभ्रष्ट । घ्राणेंद्रिय सुगंध अष्ट । महाधीट तो मग्न सदा ॥८४॥ तदा तो राया जयसेन । दुःखी जाला राज्याविन । मला दिल्ह त्यान काढोन । नाहीस करीन मी त्यासि ॥८५॥ नेकलोभ धरोनी प्राणी । घात इच्छिती अंतःकरणी। त्या शरयू नदीत जावोनी । सुवासनानि जळक्रीडा ॥८६।। तेव्हा तो राजा जयसेन । तया क्रोध जाला उत्पन्न । विषवास पुष्प आणोन । टाकिली त्या नदीमाजी ॥८७॥ पुष्प आली वाहात वाहात । गंधमित्र धरी तो हस्त । घाणेंद्रिय सुवास घेत । जाला मृत्यू विषप्राशनी ॥८८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org