________________
प्रसंग सदतीसावा : ४९३
कोणी एक चतुर नर । शुचनीकत्वं ग्रामांतर । गंधर्वसेनेसी समाचार । शृत समग्र समुदाय ॥१०॥ करोनी षोडशाभरण । सखी समुदाय घेवोन । करीती जाली ते प्रयाण । सज्जन गुणीजन सांगाते ॥१०१।। येरीकडे महंतमंडळी । सर्व निद्रिस्त वृक्षातळी । वीणावाद्य समूह जवळी । तव तयास्थळी गेली ते ॥१०२।। तेथे देखीला समुदाय । अशोकबृक्षी निद्रिस्त । आहे शिष्याशी पुसे नाम काय । सांगावी सोय तयाची ॥१०३॥ ऐकोनिया तयाची कीर्ति । वीणावाद्यादि सर्व स्थिति । गंधपुष्प सामग्री होती । ते ठेविती पादपस्थळी ।।१०४।। तेथे अरुची देखोनिया । त्वरा गेली ते स्वठाया । पाळ अशोकवृक्षच्छया । पाहोन हृदया समजला ॥१०५।। तत्प्रतिज्ञा ऐके श्रवणी । म्हणे धन्य धन्य कामिनी । आम्ही ज्ञानहीन म्हणोनी । गेली परतोनी ग्रामात ॥१०६।। ते समजोनीया त्वरेन । राजसभे शीघ्रगमन । रायसन्मान आदरेन । दिधले स्थान यथायोग्य ॥१०७॥ कन्येचे मंदिरासमीप । ठाव दिधला रायभूप । सर्व राहिले गुप्तरूप । दिनसमीप पश्चिम रात्रौ ॥१०८।। वीणानाद मंजुळे स्वर । गीतगायन सप्त स्वर । कंठ दीर्घ मनोहार । कोकिळस्वर प्रियकर्ण ॥१०९।। गंधर्वसेनेन ऐकोन । नादलुब्ध कर्ण विषयान । मृगप्राय ते देहभान । गेली विसरोन पदभूमी ॥११०॥ नादसन्मुख ते भ्रमत । माडीवरोन खाली पपात । पद्मशरीरी दुःखित । जाला घात कर्णेद्रियाने ॥१११॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org