________________
४८८ : आराधना-कथाकोष
पापे दरिद्र जाला व्याप । अन्नाविना दिसे कुरूप । दुःख भोगिती पूर्वपाप । दरिद्रभावना आचार यासी ॥४५।। अन्नासाठी ते जाली दासी । सागरदत्ताचे गृहासी । भावरीस येता अजिकेसी । पाहता तीसी जातिस्मर ॥४६॥ पूर्वी देहे लोभ धरिला । राजमद अनाचार केला । दीक्षा घेवोन गमाविला । धर्म बुडविला जीव पापी ॥४७॥ धिक् धिक् ते तारुण्यपण । जळो जळो रूप मदन । आपनिंदा तिन करोन । पापदहन बाईस पाहता ॥४८॥ नेम घेतला बाईपासी । तीव्र तप भावि मानसी । खंडोनी अष्टकर्मासी । मोक्षमार्गासी जाईल ते ॥४९॥ ऐसे जानोनी भव्य नर । लोभमाया करावी दूर । साधावे मोक्षाचे माहेर । देवगुरूशास्त्र रत्नत्रय ॥५०॥ श्लोक: मायैऽषा पशुयोनि दुःखजननी माया कुळध्वंसिनी । माया रूपयशोमहत्त्वसुगती श्रीशनि शिनी । ज्ञात्वेत्थं जिनधर्मकर्मनिरतः सत्पंडितैर्दूरतः । त्यक्त्वा तां भवसागरस्य लतिकां धर्मेऽच कार्या मतिः ॥५१॥ इति श्री मायाशल्य-पुष्यदत्ता कथा ४६ छेचाळिसावी । शर्मसस्यांबुदं नत्त्वा, श्रीजिनाघ्रिद्वयं मुदा । वक्षे मरीचिवृत्तान्तं, पूर्वसूत्रानुसारतः ॥५२॥ अयोध्या नगरी आदिनाथ । भरत चक्री पुत्र त्यात । तत्पुत्र मरीचि ज्ञानवंत । सम्यकदृष्टी जाहला ॥५३॥ इंद्र नागेंद्र चंद्र सूर्य । शतइंद्र पूजिती पाय । श्रीमदादि जिनेश्वर राय । समश्रुती होय कैलासी ॥५४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org