________________
प्रसग सदतासावा: ४८७
प्रणम्य त्रिजगन्नाथं । श्रीजिनं शर्मकोटिदं । मायाशल्यकथां मायाविनाशाय गदाम्यदं ॥३३॥ जितात ग्राम ते पत्तन । पुष्पचूळ राजा सज्ञान । पुष्पदंता प्रिया षड्गुण । पूर्वपुण्य सुखी नांदती ॥३४॥ एकदा राजा सभे आत । सभे बैसला अमरनाथ । पार्श्व मुनींद्र आले तेथ । केला नमोस्तु पंचांग पै ॥३५॥ धर्म उपदेश व्याख्यान । स्वर्गमोक्षाचे कारण । रायासी वैराग्य उत्पन्न । दीक्षा कल्याण विधियुक्त ॥३६।। राजस्त्रिया जे पुष्पदत्ता । अर्जिका ब्रह्मला ख्याता । दीक्षा क्षुल्लका मदविता । पुष्पदत्ता मिथ्यातीनीते ॥३७॥ आनिक अजिका येतात । नमन न करीच तयात । तयाची कुचेष्टा करीत । धिक् जीवित मूढाभिमानी ॥३८॥ तथा तेची अजिकाबाई । सुगंध चचि अपुले देही । देहसंस्कार ग्रानबोई । दुःखदायी संन्यासमार्गा ||३९॥ तेव्हा गुरू अजिका म्हणे । हे नोव्हे दीक्षेचे लक्षण । शास्त्रयुक्त नोव्हे ज्ञान । लागे दूषण जिनमार्गासी ॥४०॥ ते ऐकता चित्तमानस । जे आवडे माझे चित्तास । तेचि करीन सावकाश । गुरूउपदेश आयकेना ॥४१॥ नानापरी बाई शिकवी । परि मन तिचे न भावी । जैन मार्ग अजिका दावी । तरी ते न ठेवी अंतरात ॥४२॥ ऐसे जे का दुष्टदुर्जन । तयासी उपदेश न करणे । करिता ज्ञानिया येईल शीण । अधर्मी जन नायकती ॥४३॥ एवं शरीराची माया । दीक्षा घेवोन गेले वाया । आयुष्यान्ती जन्म तया । चम्पापुरीया श्रेष्ठीगृही ॥४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org