________________
४८६ : आराधना कथाकोष
अवधी मुनी गुणवंत । सांगती भवांतर गणित । सोमा ब्राह्मण तुझा कांत । लक्षुमीवंत जैनधर्मी ॥२२॥ तुझे नाव लक्षुमी मती । मान गर्व तुझिया चित्ती । तारुण्यमद पडली भ्रांति । निंदा करिती साधुसंता ॥२३॥ निंदेचे पाप दारुण । कुष्ट दुर्गंधी अंगी उत्पन्न । अग्नीपात रजकजनन । गर्दभी जन्मोन शूकरी तू ॥२४॥ कुकुरी कुकरी जन्म जाला । तो त्या घडीच वाया गेला । धीवरकुळी जन्म जाला । दुर्गध दाटला तव अंगी ॥२५॥ ते ऐकोनिया भवांतर । पापास भ्याली ते सुंदर । जेन कर्म फिटे दुर्धर । सांगा मुनिवर दयाब्धी ॥२६॥ तेव्हा समाधीगुप्त ऋषी । भव्यप्राणी जानोनी तीसी । व्रतनेम तया उपदेसी । क्षुल्लिकानेमासी दिधले ॥२७|| तप जप शक्तीनुसार । निंदाकर्म जाल दूर । आयुष्याती स्वर्गमंदिर । पुन: अवतार नरदेही ॥२८॥ भीमरथ राजा कुंडाख्यनगरी । यशोमती तयाची अस्तुरी। तया वंशी जाहाली पुत्री । रूपिणी सुंदरी मंडिता ॥२९॥ ते परनीली नारायण । जैनधर्म शुद्ध पुण्य । जपतप अनुष्ठान । पूर्वपुण्यात सर्वसुख ॥३०॥ तस्मात् कारण भव्यप्राणी । धर्म दृढ दशलक्षणी। देव गुरू सेवा करोनी । सुखसदनी मोक्षमार्ग ॥३१॥ काव्य-सुकुलजन्म-यशो- वर-संपदा, सकलशास्त्रमतिर्बुधसंगती: सुगतिरद्भुतशर्म शिवोद्भवं भवति जैनमतोत्तमसेवनात् ॥३२॥
इति मानकथा लक्ष्मीमती-पंचेताळासावी ॥४५॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org