________________
प्रसंग सदतीसावा : ४८५
|
पाहोनचि कत्छा करि मनी । म्हणे कुत्छळ नग्न मुनी । काय आले गृह आंगनी । मुखवचनी निंदनीक ॥ १० ॥ दोन्ही कपाट लाऊन । स्वामिसी बोले अनिष्ट वचन । तारुण्यमद ते पापीन । केला तियन अंतराये ॥ ११ ॥ मुनीराज तो जगद्वंद्य । रत्नवयचारित्र शुद्ध । वना जावोन ज्ञान भेद । द्वादश भेद तपश्चरण || १२ || तत्पापास्तव ते नरकासी । जाईल सातवे भूमीसी । सध्या कुष्ट व्यापला तीसी । दुर्गंधासी ते पापीन वो ॥ १३॥ ते जन्मली रजक योनि । जन्मताचि गेली मरोनि । तिर्यंच गर्दभीचे योनि । पापखानि ते मृत्यु पावे ।। १४ ।। शूकरी जन्म जन्म पावोनिया । जन्मताचि ते गेलि वाया । कुर्कुरी क्रूर जन्मोनिया । पुनरपि तया जन्म तोचि ॥ १५ ॥ एकदा कुर्कुरी अग्नीत । दग्ध जाली ते पापकृत्य । भोग सरला तिर्यंचात । राहला किंचित् पापभोग ॥ १६ ॥ ते भृगुकच्छाख्य नगरी । नर्मदा नदीचे तीरी । धीवरगृही जालि पुत्री । दुर्गंध शरीरी अतिक्लिष्ट || १७ || अहो नरदेहा येवोन । मदगर्वाष्ट न करन । षड्रिपुते धिक्कारून । धर्म आचरने ज्ञानीये ॥ १८ ॥ तेव्हा ते धीवरी नित्य नित्य । नाव चालवी नर्मदेत । जनमेळा नारीनरात । उतरी तात पिता कळती ॥ १९॥ एकदा देखिले तिने मुनी । जातिस्मरण अंतःकरणी । पापात मूच्र्छना येवोनी । सावध होवोनी नमस्कारी ॥२०॥ अहो हो स्वामी मुनीराया । मम जन्म व्यर्थ सखया । पापकर्म पूर्वीच मया । सांगा स्वामीया दयानिधी || २१||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org