________________
प्रसंग सदतीसावा श्री वीतरागाय नमः
यस्य ज्ञानं जगबंधोर्लोकालोकप्रकाशकं । श्रेयसे तं जिनं नत्वा वक्षे मानकथानकं ॥१॥ मागध देश तो विख्यात । लक्ष्मीग्राम ते शोभिवंत । सोमदेव द्विज तो नांदत । रूपवंत लक्ष्मी स्त्रिया ॥२॥ रूप मद आणि तारुण्य । यौवन मद गर्व मान । लक्ष्मी मद उन्मत्तपन । सदा दर्पण मुखात पाहे ॥३॥ एकदा सोमदेव विप्र । जैनधर्मी हो पवित्र । पक्षमासोपवास मुनींद्र ! पाहिले नेत्र द्विजवरे ॥४॥ समाधीगुप्त मुनीराय । त्रिगुप्त धी आचार्य । क्षमादिशांति धीर वीर । आहारकार्य ईर्यापथ ॥५।। मध्याह्व ऋषि भोजनार्थ । औट हस्त भूमी शोधीत । येते जाले ते नगरात । पाहिले अवचित सोमान ॥६।। मुनी रत्नत्रय धीर । त्रिगुप्ती आचार्य दिगंबर । दर्शन पाप जाय दूर । नमोस्तु त्रिवार तिष्ठ तिष्ठ ॥७॥ पढगाविले ज्ञान मुनि । बैसविले ते उंचस्थानी । रमण म्हणे ऐक रमणी । आहारदानी पुण्य जोडा ॥८॥ ऐसे सांगोनि स्नानासी गेला । मान गर्व त्या ब्राम्हणीला । दर्पण घेवोन पाहे मुखाला । गुरू देखिला सन्मुख पै ॥९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org