________________
प्रसंग सदतीसावा : ४८९
ते
श्रुत जाल भरतासी । वंदने चालले परिवारेसी । प्रदक्षिणा तीन तयासी । साष्टांगेसी नमस्कारिले ॥ ५५ ॥ धर्मोपदेश ऐकोनिया । भरत हस्त जोडोनिया । पृच्छा केली जिनराया । सांगा स्वामिया मम प्रश्न ||५६ || आपला समस्त परिवार | यामध्ये कोणी तीर्थंकर । होईल काय वदा उत्तर । कृपासागर गुरूराया ॥५७॥ भरतोत्तर ते ऐकोनी । श्री तीर्थंकर पंचज्ञानी । वदते जाले केवळवाणी । समवशरणी बारसभा ॥ ५८ ॥ भरतपुत्र मरीची जीव । अंतिम तीर्थेश वैभव । होइल पंचज्ञानदेव । सृतिसमवशरणाधिकारी ॥ ५९ ॥ हे ऐकोनि भरतेश्वर । हर्ष जाला हृदयांतर | मरिची म्हणे सत्य वैखर । निश्चयांतर संशय नसे ||६० ॥ आता काश्या करावे श्रम । मूढबुधी लोभी अधम । त्यक्त्वा व्रत सम्यक्त्वधाम । मिथ्या कुधर्म अंगीकारी ।।६१ || सांख्य मतादि अनेक । कुबुधी आणि अभाविक । जनाचार आणि सात्विक । दुःखदायक भवभवी ॥ ६२ ॥ सोडोनिया अत्याचार | पंचविषय घराचार | जीवासी अनंत संसार । वारंवार त्या जन्ममृत्यू ॥६३॥ नाना जन्म लक्ष चौन्यांशी । जीव सोशी सुखदुःखासी । धर्मे विना भ्रांति जीवासी । लोभ मानसी न धरावा ॥६४॥
प्रमाद माया इच्छा अंतरी । आळस कुटुंबाचा वैरी । भोग भोगवी गती च्यारी । भव्य अंतरी समजावे ॥ ६५ ॥ असो धर्म त्वरितागता । यमनियम धरावा चित्ता । भव्य प्राणी सावध आता । पुढील कथा चित्त द्यावे ||६६ ||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org