________________
प्रसंग छत्तीसावा । ४७९
देवकी म्हणे अहो मुनी । स्वप्न देखिल म्या रयनी । आम्रशाखा करी धरोनी । फळ नयनी देखिली अष्ट ॥१५१॥ जुग्म फळ देखिली त्रय । एक पाहिले आकाशात । अष्टम फळे पक्व होय । वरत जाय मागुति ते ॥१५२।। ऐसे देखिले स्वामि नयनी । ते सांगावे कृपा करोनी । ऐक भो वसुदेव ज्ञानी । भव्य शिरोमणी वसुदेव ॥१५३।। मोक्षगामी सहा पुत्र । संशय नसे वो तिळमात्र । सातवा जो जलदनेत्र । पुण्यपवित्र नारायण ॥१५४॥ तोही उर्ध्वगामी जीव । आठवा जो बळ रामदेव । मोक्षासी ज्ञानवैभव । याचि भवे मुंडकेवळी ॥१५५।। ते ऐकोनिया मुनीयुक्त । परमानंद हृदयात। विचार करी स्वमनात । गुरूवचन सत्य सत्यची ॥१५६॥ नमोस्तु केला मुनिराया । संतोषे गेली आपुले ठाया। देवधर्म गुरू पूजाया । विश्वास हृदया सुखोत्फळ ॥१५७।। एकदा सती देवकीबाळा । गर्भ उत्पन्न सुकुमाळा । नेक सोहाळा पूर्ण डोहाळा । पुत्रयुगुळा जन्मरात्रौ ॥१५८|| तया क्षणी पुण्ययोगेन । देवताद्वयं स्वर्गीहून । बाळक दोन्ही करे घेवोन । चालले त्वरेन पुण्य ठाया ॥१५९॥ भद्रिलाख्यपुरी नगर । तेथे श्रेष्ठी श्री श्रुतसागर । आळंकाख्या प्रिया सुंदर । मृतपुत्र युगुळोत्पत्ती ॥१६०॥ देवकीपुत्र तेथे ठेविले । मृत बाळक घेवोनि आले । देवकीपुढे निजविले । गुप्तची गेले स्वर्गासी ॥१६१॥ आहो हो पुण्याचे कारण । स्वर्गीचे देव करिती रक्षण । तस्मात् प्राणी पुण्य आचरण । सौख्य उत्पन्न जैनधर्मी ॥१६२॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org