________________
४८० : आराधना-कथाकोष
1
सुपुण्य सुदेव पूजन । सुगुरू सुशास्त्र करा श्रवण । सुपावासी द्या तुर्यदान । पाप न करन जानोनिया ॥ १६३॥ पापी कंसासी श्रुत जाहाले । बाळ शीळेसी ताहाटिले । धिग् नरदेहासी आले । पापी ते गेले कुगतिसी ॥ १६४ ॥ एवं देवकी षट्पुत्र । तयवेळा जुग्म पवित्र | स्वर्गवासी जे व्यंतरेंद्र । पुण्यसूत्र रक्षिती तयासी ॥१६५॥ भद्रिलाख्यपुरग्रामी । षट्पुत्र ते ज्ञान आगमी । चेर मांगधारि सुखधामी । देवकी सुखी स्वे आश्रमी पै ॥ १६६ ॥ एके दिवसी पुण्यप्रसंग | सप्तमास गर्भ प्रयोग | अष्टमी रोहणी शुभयोग । निशि प्रसंग माध्याह्नवेळा ||१६७ || कृष्णजन्म मथुरेसी जाला । शत्रुविध्वंस रवि उदेला | नववा नारायण उपजला । अर्धचक्री जाला त्रिखंडपती ॥१६८॥ दुष्टाचे करील तो दंडन | साधुसंताचे प्रतिपाळन । मात पिता आणि उग्रसेन । राजि स्थापोन यशस्वी होईल ॥ १६९॥ तेव्हा रातांध ते माध्याह्नी । तुषार गगनीहूनी ।
वसुदेवे पुत्र मुखनयनी । हृदयभुवनी संतोष जाला ॥ १७० ॥ तत् रक्षण करावयासी । पाचारिले बळिभद्रासी । छत्र धरिले बाळकाशीरी । गोकुळवासी गमनमार्ग ।। १७१ ।। बाळक घेवोनिया पोटसी । दोघे निघाले तमनिसी । मार्ग न दिसेच तयासी । विचार मानसी करिताती ॥ १७२॥ तेव्हा पूर्वपुण्य योगेन । देवता आलासे धावोन | शीघ्र वृषभरूप धरोन । दीपिका दोन शृंगाच्या ॥१७३॥ त्याचे वैक्रियिक शरीर । प्रकाश करीत चाले म्होर । नगर कपाट कुलूप दृढतर । कैसे बाहेर जावे आता || १७४ |
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org