________________
प्रसंग छत्तीसावा : ४७३
असो जाहले नवमास । जन्मला कुपुत्र कुळनाश । जैसा वेळु त अग्नीप्रकाश । करी दहनास वृक्ष कुळी ।।८०॥ असो राजा एके दिवसी । पुत्रमुख आला पाह्यासी । पाहता क्रोधदृष्टीसी । वळल्या मुष्टीशी पाहे राजा ॥८१|| राय विचार करोनी । कांस्यपेटारीत आणोनी । पुत्र पापी त्यात ठेवोनी । केली वेष्टनी रत्नकांबळा ॥८२॥ स्वनामपत्र ठेवि त्यात । मांदुस सोडिला यमुनेत । तो चालला वाहत वाहत । कासी देशात कौशांबी नगरी ॥८३।। तेथ कोतवालाची स्त्रिया । गेली उदक आनावया। कांसमांदुस पाहोनीया । घेवोनीया आली गृहासी ॥८४॥ पेटारी पाहे उघडोन । पुत्र देखिला तिन नयन । म्हने मला दिला गंगेन । वांझपण फेडल माझे ॥८५।। सांगोनिया भ्रतारासी । पुत्र जाला बहुदिवसी । शिरनी वाटा नगरासी । आनंदासी वाद्यगजरे ॥८६॥ बाळ कांसपेटारीत । कंस नाम ठेविले त्यात । माता पिता खेळवीत । पुत्र वाढत दिन दिन ॥८७॥ यानंतरे ऐकावी कथा । नमस्करोनी जिननाथा । जिनवाणी सरस्वती माता । वरदहस्ता कवित्वा देई ॥८८|| बाळ दिन दिन वृद्धी करी । बीज चंद्राचे परी। अष्टवरुषे जाल्यावरी । परपोर मारी क्रोधान ॥८९।। नगरजन पिटाविला । महाक्रोधान कंस गेला । सौरपुरी यादवा भेटला । स्थिर राहिला वसुदेवापासी ॥९॥ तेथे करी विद्या अभ्यास । महाप्रतापी बलाढय दिसे । यानंतरे कासी देश । नगरी असे कौशांबी ॥९१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org