________________
४७२ : आराधना - कथाकोष
मारोनी रेवतीचे उदरी । गर्भी उग्रसेन वैरी । पात्रजन्माचे वैरपरी । सावध अंतरी सम्यक्त्वीजन || ६८ || क्रोध लोभ मान माया । त्याग करा चतुष्कषाया । जीव मोक्षासी जावया । त्रिगुप्ती सखया पाळाव्या ॥ ६९ ॥ असो त्या रेवतीच्या उदरी । डोहळे होती नानापरी । राणी कृश जाली शरीरी । कंकन कोपरी चालली || ७०॥ रमण रमणी महाप्रीती । उग्रसेन म्हणे वो रेवती । तुमचे शरीर प्रकृती । दुर्बळ दिसती किंकारण ॥७१|| लज्जायमान अधोमुख । हर्षवदने बोले कौतुक | मज न वदवे देहनायक । देहे कौतुक असो काही ||७२|| पुनरपि आग्रह करोनी । मज सांग तू मनरंजनी । काय इच्छा असेल मनी । निःशंक होवोनी सांगावे ||७३ || अहो हो स्वामी ऐका वचन । उदरी गर्भ झाला उत्पन्न । दुष्ट डोहाळे मज कारण । तुमचे हनन करावे ||७४|| अशुद्ध तुमचे प्रासावे । तुम्हासी बंधन करावे ।
नष्ट ह्या गर्भाचे स्वभाव । मज न सांगवे राया तुम्हासी ||७५ || तेव्हा त्या राय उग्रसेन । स्त्रियची प्रीती चित्ती धरोन । डोहाळा मी पूर्ण करीन । सावधमने असावे तुम्ही ||७६ || राय आपले चित्र केले | दाळिंबीरसान भरियले । पलंगासमीप ठेवियले । राणीस उठविले सुद्रीहस्ते ॥७७॥ जागृत होवोनीया पाही । क्रोध उत्पन्न जाला देही ! तया धरोनी लवलाही । हा कष्टं देही पापरूपात्मा ॥७८॥ ते पाहोनी दृष्टि रायाने । म्हणे हे दिसत महाविघ्न । कर्मरेखा विधातियाने । भोगल्यावाचोन न चुकेची ॥ ७९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org