________________
प्रसंग छत्तीसावा : ४७१
चतुर्थ मासाची गणित । भावरी मंत्र जाला चलित । आंगोळी सोडोनिया तेथ । द्वितीय गृहात न्याहाळी ॥५६॥ तिथे राज्य भय करीता । पाणि पाणि न धरी हस्ता। आंतराय गुरूसी होता । तृतीयपंथासी चालले ॥५७।। भ्रमण करिता नगरात । वेदक्षीण जाहाले तेथ ।। रिक्तहस्त श्रावकात । पाहाता चतुर्थ अंतराय ॥५८॥ एक आंगोळी भुजेवरी । कमंडलुपिच्छी वाम करी । हिंडोनिया सर्व नगरी । पंचप्रकारी अंतराय ॥५९।। ग्रामातून बाहेर येती । मूर्च्छना येवोनी लोक जाती। धर्मवंत गावातून येती । श्रावक करिती नमोस्तु ।।६।। एकमेका बोलती स्पष्ट । हा हा स्वामीशी महाकष्ट । राजा अज्ञानी महानष्ट । भावरी प्रष्ट आम्हा करू नेदी ॥६१॥ तेव्हा बोले वृद्ध श्रावक । गुरूराज ज्ञानदीपक । चारित्राब्धि मुनीनायक । पुण्यदायक भव्यजीव ।।६२।। ऐसे मुनीराय ऐकोनी । हृदयी उसळला कोपाग्नी । गोवर्धनगिरी जावोनी । देवता आह्वानी समीप ॥६३।। आम्ही सांगतो ते करावे । उग्रसेनासी तुम्ही मारावे । देवता म्हणे हो गुरूदेव । सम्यक्त्वी राव जिनधर्मी ॥६४॥ मनी म्हणे देव्या ऐकावे । वचन त्वा खरे करावे । पुढील जन्मी साह्य व्हावे । वचन द्यावे सत्यभाक ॥६५॥ राया उग्रसेनासी त्याने । वैरबंध जाला निदान। क्रोधाने गमविले पुण्य । तपासी विघ्न क्रोध करिता ॥६६॥ शुक्लध्यानाचा आला समय । केवळज्ञान जेन होय । ते गमविले मुनीराये । पापउदय कुतपाचे ॥६७||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org