________________
४७० : आराधना-कथाकोष
तेव्हा सुविद्या सीधी देवता । साधुशी करी विनयता । तुम्हावरी अमुची ममता । कार्यसिद्धता करू तुमची ||४४ || ते ऐकोन लोभभावेन । काही पडेल प्रयोजन |
तेव्हा तुम्ही साह्य होऊन । दासत्व करा कार्यसिद्धी ||४५ || त्या देवता गुणमंडिता । स्वस्थानाशी गेल्या त्वरिता । मासोपवास झाला पूर्णता । भावरी करिता उद्योगी ||४६ || तयाचे भावरी कारण | श्रावका वर्जि उग्रसेन । मम गृही हो उद्या पारणं । तुम्ही करणे सावकास ||४७ || तेव्हा ते वशिष्ठ गुरूराय । पारण्या चालले लवलाहे । पंचमुद्रा धरी हृदय । जंतु पाहे ईर्यापथ ॥४८॥
तव रायाचा हस्ती सुटला । नग्रामाजी कोल्हाळ जाला । स्वामीसी अंतराय पडला | परतोनी गेला गिरीवरी ॥४९॥
क्षुधाक्रांत तो मुनीराय । उग्रसेना स्मरन नोव्हये । श्रावक म्हणती बरे नो । जाला अंतराय गुरूसी ॥५०॥ दो महिन्याचा उपास जाला । स्वामी चालले भावरीला | उग्रसेनाच्या वाड्याला । आग्न चेतला समीप ।। ५१ ।। तृतीयमास पर्वतावरी । शुक्लध्यान धरीले भारी । कायोत्सर्ग ते शिळेवरी । जेवि गिरी अचेल पै ॥५२॥ राज्यमद जे का भुलले । मगनमस्त अंध जाले । देवगुरूशी विसरले | गमाविले पुण्यसंचित ॥५३॥ विस्मृती झाली रायासी। तीन मास मुनी उपवासी । मुद्रा धरि दक्षिणभुजेशी । चाले भ्रामरिसी मंदगति ||५४ || उग्रसेन मूढतय | भावरीची न जाने सोय । पुण्याविना मानवदेहे | सिद्धी न होय पुण्याची त्या ॥५५॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org