________________
प्रसंग छत्तीसावा : ४६९
कायाकष्ट तप करीति । दयाहीन कुतप करिती। अशुभप्राप्ती श्वभ्रठाव । तयासी नाही शुभगती ॥३२॥ तदा क्रोधे बोले तयासी । आम्ही ज्ञानी महातपस्वी । अज्ञानी म्हणता आम्हासी । सांगा ज्ञानासी तुमचिया ॥३३॥ आचार्य तयासी वदत । तुम्ही ज्ञानी सत्य यथार्थ । आता कोठे जाता प्रस्तुत । तव तो वदत कुतपस्वी ॥३४॥ तपबळे मी स्वर्गवासी । घेईन त्या इंद्रपदासी । तव आचार्य म्हणती त्यासी । आत्मज्ञानासी जाणता तुम्ही ॥३५॥ ज्ञान दृष्टी तुम्हा कारण । काष्ठी सर्प होतो दहन । या तपाने नर्कभुवन । स्वर्ग पे न कैच पाप्यासी ॥३६॥ तेव्हा तो खिजला तापस । काष्ठ आपटीले भूमीस । सर्प जळता पडे भूमीस । देखिले त्यास सर्वांनी वो ॥३७॥ हा कष्ट त्वं मूढ अज्ञानी । कुसाधन पाप पंचाग्नी।। अनंत जीवहिंसा करोनी । नभुवनी जन्म त्यासी ॥३८॥ ते पाहोन तापसचित्ती । म्हणे धन्य ज्ञानी हे जिनमती । यासी शरण जावोनी चित्ती । गर्वाची भ्रांति सोडोनिया ॥३९॥ युगुळ पाणि जोडोनिया । शरणांगता तारी सखया । कृपा करावी गुरूराया। धर्म जीवदया सांगा स्वामी ॥४०॥ सुदेव सुगुरू सुशास्त्र । सुधर्म सुबुधी पवित्र । सुज्ञान सुतप पवित्र । धर्मसूत्र दशलक्षणी ॥४१॥ जैनधर्म सारासार । सर्व जीवदयेचा प्रकार । ऐकोन झाला दिगंबर । वशिष्ठ मुनींद्र तपस्वी ॥४२॥ एकदा गोवर्धन पर्वती । वशिष्ठ कीर्ति मुनि यती । मथुरासमीप ध्यान धरिती । तप करिती मासोपमास ॥४३॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org