________________
४६८ : आराधना-कथाकोष तप्त ऐकोनिया तो तापस । क्रोधे बोले भानोसिनीस । आम्ही तपेसि चंडौंश । वायो आहारा करीतो गे ॥२०॥ आगे रंडे हं विप्रपुत्र । तू काय वदसी गे वगत्र । कोठे त्वा पाहिले गे नेत्रे । मम सूत्र पापिनी गे त्वा ॥२१॥ तेव्हा ते प्रियंगा भानसीनी । रायासी सांगे निर्भयमती । धीवरकन्या नाव निशानी । पुत्र जननी गंगातीरे ॥२२॥ माता धीवर मत्स्य मारी। जिह्वालंपट मांस आहारी । कुतपस्वी भ्रष्ट आंतरी । पापाचारी मिथ्याती हिंसक ॥२३॥ जटा शीरि जीव उत्पन्न । क्रोधाग्नी जाने टानटोन । भूतप्रेताते आह्वानून । भुलती जन चमत्कारासी ।।२४।। ज्याचा निश्चय धर्मावरी । भेति कुविद्या त्यासामोरी । तप करीती महा अघोरी । सुतप परि नाही राया ॥२५।। परीक्षार्थं तो मुनीश्वर । काडिता जाला तो जटाभार । जळमासुळी पडली म्होर । ते नजर सर्व पाहाती ॥२६॥ तापसाचा मानभंग जाला । खाले पाहोन दूर गेला । गंगायमुना संगमाला । गंधवतीला पाहातसे ॥२७॥ तेथे पंचाग्नीसाधन । करीत बैसला अज्ञान । तत्समयी त्याच मार्गान । मुनींद्र सुज्ञान सुतपस्वी ॥२८॥ पंचशत शिष्यासहित । जैनधर्मी ज्ञान सिद्धान्त । वीरभद्र महामहंत । पाहिले तयाते सर्वानी ।।२९।। एक शिष्य म्हणे गुरूशी । अघोरतप करी ऋषी। येणे काय हो प्राप्त यासी । सांगा आम्हासी गुरूराया ॥३०॥ तेव्हा श्रीपूज्ये ऐकोनिया । अवधिज्ञाने पाहोनिया । बोलते झाले ऐक सखया । मिथ्याती यासी ज्ञान कैचे ॥३१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org