________________
४७४ । आराधना-कथाकोष तेथ सिंहस्थ राव । महाबलाढय वैभव । जरासंधासी वैरभाव । अजिंक्य सर्व जिकवेना ॥९२॥ जरासंध उपाय केला । कन्येचा विवाह मांडला । स्वयंवर मंडप दिधला । पाचारिला राज्यभार ।।९३।। रायान पन केला तेथ । जो जिकील सिंहरथात । कन्या देईन मी तयात । देशग्रामात देईन ॥९४।। ते ऐकोनि यादवराय । वसुदेव समुद्रविजय। . ज्येष्ठबंधुस करोनी विनय । केला समुदाय वसुदेव ।।९५।। पोदनपुरीचे सर्व सैन्य । सामंतभद्र सर्व मिळोन । चतुरंग सेना घेवोन । सिंहरथ ग्राम उद्यान वनी ॥१६॥ संग्राम जाला उभयतासी । सिंहरथ जिंकिले सैन्यासी । ते पाहोनी वसुदेवासी । क्रोध मानसी वीरश्रिय ।।९७।। सारथी बोलाविला कंस । पाचारिले सिंहरथास । बाण लावोनिया सीतास । रणांगणास उभे ठेले ।।९८।। बाण बाणाशी ते जुळती । रथ रथासी पाचारीती। घोरांदर युद्धे भीडती । नाटोपती एकमेका ॥९९।। महाबलाढय कंसवीर । वसुदेव रणरंगधीर । सिंहरथ जिकिला वीर । कंस सामोर धाविन्नला ||१००॥ धरिला तो जरासंध वैरी । बंधहास्त तत् रथावरी । येवोनी वसुदेवासामोरी । नमस्कार करी कंसवीरा ॥१०१॥ सैन्यात जाला जैजैकार । शत्रु जिंकिला यादववीर । जरासंधा संतोष फार । विजयी थोरे मम कन्या ॥१०२।। मंडपात सर्वही मिळाले । जरासंध तेथे अवलोकिले । वसुदेवासी त्यान पाहिले । बोलते जाले बधांजुळी ॥१०३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org