________________
४५६ : आराधना - कथाकोष
आपन गेला पाकगृहात । स्वामि बैसले दुकानात | नृपमोर आला चरत । अमोल्य रत्नात देखिले ॥ १४९ ॥ भक्ष मनोन गिळिले त्याने । ते घसा बैसले दाटोन | सोनार पाहे राज्यरत्न । म्हणे कवने नेले काय ॥ १५० ॥ मुनिराज होता येथे । दुजा कोन्ही नव्हता सत्य । मुनिराज सांगा सत्य । रत्न तुम्हात कास्या व्हावे ॥ १५१ ॥ तुम्हास अगत्य असेल । तरि मी देतो दुज चांगले । राजा माझे घर लुटिल । क्षय करिल कुटुंबाचा ।।१५२।। आता द्यावे हो शीघ्र रत्न । न देता अस्त माझा प्राण । मुनिराया दया करोन । भ्रामरिकारन उशीर ॥ १५३॥ यति जानोन मौन्य धरि । वचन गुप्ती मनांतरि । कायागुप्ती बाह्यात्कारि । मन आंतरि विचारित ॥ १५४ ॥ कर्माबरा धरला द्वंद्व | फोडोन घेई आपला बंध | याच देह्यासि व्हावे शुद्ध । वैर समंध जितावे वेगी ॥ १५५ ॥ देहावरि क्रोध केला । क्षमा सैन्यक पाचारिला । शांतिभाला हाति घेतला । कर्मवैन्याला जितावया ॥ १५६ ॥ रत्न द्यावें म्हणे सोनार । कोने नेले सांगा सत्वर । न देता मैंद खरेखुरे । बोला सत्वर अता वेगी ॥ १५७ ॥
पुत्र मुकुंदा म्हणे स्वामी । देहो संकल्प करितो मी । परिवा स्त्री म्हणे द्या स्वामी । अळिकार मी सर्व देते ॥ १५८ ॥
राज्य क्रोधाचे भयात । कोल्हाळ करिती समस्त ।
जन मिळाले बहुत | म्हनति समस्त द्या स्वामी ॥ १५९ ॥ धैर्यगजासि स्वार जाले । क्षमावोडन करि घेतले | कर्म्मवैरि सन्मुख आले । त्याने विधीले शब्दबाण ।। १६० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org